आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाचा निकाल:बीड येथील 1232 ठेवीदारांची 20 कोटींची फसवणूक; आरोपीचा औरंगाबाद खंडपीठाने केला जामीन मंजूर

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यादा व्याजाचे व दाम दुप्पट व तिप्पट आमिष दाखवून संपूर्ण देशातील लाखो ठेवीदारांना कोटयावधी रूपयांना गंडा घालणाऱ्या समृध्द जीवन फुडस इंडिया लिमीटेड व समृध्द जीवन मल्टी स्टेट को-ऑपरेटीव्ह संस्थेच्या मुख्य सुत्रधार महेश मोतेवार याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती एस. जी मेहरे याचा न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला. बीड येथील गुन्हयामध्ये 1232 ठेवीदारांना फसवून सुमारे 20 कोटी रूपयांची फसवणूक केल्याचे दोषआरोप पत्र बीड पोलिसांनी दाखल केले होते.

खंडपीठात दाखल केला अर्ज

बीड येथिल बीड शहर पोलिल स्टेशन मध्ये महेश मोतेवार याच्या विरोधात भारतीय दंडसहितेच्या कलम 420, 406 आणि 34 व महाराष्ट्र ठवीदारांच्या (वित्त्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 व 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात मोतेवार याला पोलिसांनी 18 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली होती. व राजकोट येथील कारागृहामध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने मोतेवार याचा जामीन अर्ज फेटाळल्या नंतर त्यांनी अ‍ॅडव्होकेट प्रसाद जरारे यांच्या मार्फत औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला. समृध्द जीवन घोटाळयामध्ये केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) ने केलेल्या तपासाच्या अनुषंगाने मोतेवार याची संपूर्ण मालमत्त्ता व बॅक खाते संलग्न कलेले आहे. घोटाळया संदर्भातील 2010 ते 2015 या कालावधी मधील व्यवहारांचा तपास सीबीआय ने केलेला आहे.

दोषपत्रात फसवणूक नमूद

सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण घोटाळा व मोतेवार याच्या सर्व कंपन्यांचा तपास सीबीआय ने करावा असे आदेशीत केल्यामुळे बीड पोलिसांनी स्वतंत्र तपास करून मोतेवार याला जेरबंद ठेवणे कायदयाच्या दृष्टीने चुकीचे असल्यामुळे त्यांना जामीनावर मुक्त करण्यात यावे अशी मांडणी उच्च न्यायालयात मोतेवार याच्या वतीने करण्यात आली. सीबीआय ने केलेल्या तपासामध्ये मोतेवार यांच्या कंपनीने 35 लाख ठेवीदारांकडून पैसे जमा करून सुमारे 3400 कोटी पेक्षा फसवणूक केल्याचे आपल्या दोषआरोप पत्रामध्ये नमूद केले आहे.

काय आहे घोटाळा

महेश मोतेवार याने 2022 मध्ये समृध्द जीवन फुडस इंडिया लिमीटेड या कंपनीची स्थापना केली व गाई, म्हशी व शेळी यांची खरेदी विव्री मध्ये गुंतवणूक म्हणुन ठेवीदारांना मासीक व वार्षिक हप्ता असे विविध पॅकेज देऊन पैसे जमा केले. वेगवेगळया कंपन्यांच्या माध्यमातुन मोतेवार यांनी आंध्रप्रदेश, बिहार, छत्त्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मु काश्मीर ,झारखंड, कर्नाटक, केरळा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आणि पश्चिम बंगाल मध्ये या राज्यांमध्ये एकूण 300 शाखा सुरू केल्या.

बातम्या आणखी आहेत...