आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:नाथसागरातील विहिरीसाठी 20 कोटींचा निधी ; पालकमंत्री संदिपान भुमरे यांची माहिती

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला नियमित पाणीपुरवठा करता यावा, यासाठी पर्यायी व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. यामध्ये नाथसागरात एक ते दीड किलोमीटर आतमध्ये पंपहाऊस, विहीर (जॅकवेल) निर्मितीचे काम हाेणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एका वर्षात जॅकवेलचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. व्यापाऱ्यांच्या दिवाळी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात रविवारी पालकमंत्री भुमरे यांनी शहराचा पाणीप्रश्न सोडवणे नितांत गरजेचे असल्याचे नमूद केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.

यासंदर्भात सायंकाळी परत भुमरे यांच्याशी दिव्य मराठी प्रतिनिधीने फोनवरून संवाद साधला असता ते म्हणाले की, अमृृत योजनेंतर्गत शहर पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी २७०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जलकुंभ, पाइप टाकून पाणीपुरवठा वितरण व्यवस्था बळकट करण्याचे काम होत आहे. त्याचबरोबर दुष्काळ आणि आपत्तीतही शहर पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी पंपहाऊस, विहीर असायला हवी. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सर्वानुमते वीस कोटींची तरतूद केली. त्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होऊन वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

हर्सूल तलावात वॉटरग्रीड : शहर परिसरातील उद्योग, व्यवसाय आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यानुसार नाथसागरात जॅकवेल तसेच हर्सूल तलावातही वॉटरग्रीडचे काम केले जाणार आहे. त्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध होईल, असे पालकमंत्री भुमरे म्हणाले.

धरणातील पाणीपातळी, मान्सूनवर ठरेल कामाची दिशा नाथसागराच्या एक ते दीड किलोमीटर आतमध्ये नवीन जॅकवेल निर्मितीच्या कामाचे नियोजन केले जात आहे. १०० बाय २५ रुंद जॅकवेल असेल. पाणीपातळी, आगामी मान्सून हंगाम आणि वरून वाहून येणाऱ्या पुराच्या पाण्याचा प्रवाह यावर जॅकवेलच्या कामाची दिशा ठरेल. मान्सून लांबला व जलसंचय उशिरा झाला तर लवकर काम पूर्ण होईल. - अजय सिंग, मुख्य अभियंता, एमजेपी.

बातम्या आणखी आहेत...