आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय निबंध स्पर्धा:हॅपी टू हेल्प फाउंडेशनतर्फे 20 शिक्षकांना पुरस्कार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॅपी टू हेल्प फाउंडेशनतर्फे इद-ए-मिलादुन्नबीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा झाली. यातील ७ विजेत्यांना तसेच १३ शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले. मौलाना आझाद संशोधन केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री अब्दुल सत्तार, प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे, मनपा उपायुक्त नंदा गायकवाड, जिल्हा परिषदेचे प्राथमिक उपशिक्षणाधिकारी सोफी लईक अहमद, मुख्याध्यापक संघाचे शिक्षक युनूस पटेल, प्राचार्य डॉ. सय्यद नईम, शेख अब्दुल रहीम उपस्थित होते. कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

बातम्या आणखी आहेत...