आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:20 हजारांची लाच; खासगी चालक अटकेत

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तलाठ्याकडून काम करून घेण्याचे अश्वासन देऊन २० हजारांची लाच घेणाऱ्या अब्दुल अजीज खान अब्दुल कदीर खान (४८, रा. म्हस्के गल्ली, पडेगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केेली. त्याच्यावर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला अाहे.

तक्रारदाराने मिटमिटा शिवारातील गट क्रमांक १५८ मध्ये जमीन घेतली होती. त्याचा फेर करण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयात अर्ज केला. परंतु नोंद घेण्यासाठी अब्दुल अजीजने तक्रारदाराला ‘माझी तलाठ्याशी ओळख आहे, तुमचे काम करून देतो,’ असे सांगत २० हजारांची मागणी केली. तक्रारदाराने त्याची लाचलुचपत प्रतिबंधकाचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. त्यावरून निरीक्षक संदीप राजपूत यांनी सापळा रचून लाच घेताना अजीजला ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...