आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साबुदाणा 15 रुपयांनी महागला:नवरात्रीच्या उपवासासाठी 20 टन भगर, 100 ते 150 टन साबुदाणा आवक

औरंगाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्रोत्सव काळात अनेक भाविक उपवास करतात. त्यामुळे सध्या किराणा दुकान, मॉल येथून साबुदाण्यासह उपवासाचे साहित्य खरेदी करण्यास गर्दी होत आहे. यंदा भगरीचे दर स्थिर असून साबुदाण्याचे भाव किलोमागे १५ रुपयांनी वाढले आहेत.उपवासात अनेक जण साबुदाणा खिचडी तर काही जण भगरीचा भात, भगरीच्या भाकरी करतात. मात्र सर्वात जास्त साबुदाण्याचा वापर केला जातो. खिचडी, उपवासाच्या चिवड्यासाठीही साबुदाणा वापरला जातो. बाजारात साबुदाण्याचे भाव ७० ते ८० रुपये किलो आहेत, तर भगरीचा भाव ९० ते १२० रुपये किलो आहे. दरम्यान, साबुदाणा जास्त विक्री होत असल्याने सध्या बाजारात १५ रुपयांनी भाव वाढल्याचे औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया यांनी सांगितले. नवरात्रानिमित्ताने बाजारात २० टन भगर तर १०० ते १५० टन साबुदाण्याची आवक झाली आहे.

भाजणी पिठाला होतेय मागणी उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाल्ली जात असली तरी निरंकार उपवास करणाऱ्यांसाठी उपवास पिठाला मागणी असते. नवरात्रीमध्ये महिला गृहउद्योगाला चालना मिळत आहे. देसाई गृहउद्योगाच्या ऊर्मिला देसाई यांनी सांगितले की, उपवास भाजणी पीठ म्हणजे राजगिरा, शिंगाडा, साबुदाणा, भगर चारही पिठे एकत्र करून त्यात जिरे टाकून पीठ तयार केले जाते. या उपवासाच्या पिठाला चांगली मागणी असून ३५० रुपये किलोप्रमाणे विक्री होते. राजगिरा उपवासाचे पीठ ३०० ते ३२० रुपये, शिंगाडा पीठ ३०० रुपये किलो याप्रमाणे विक्री होते. गॅस आणि धान्याचे भाव वाढल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० ते ६० रुपयांनी भाव वाढले आहेत. तरीही याची मागणी वाढलेली असल्याचे त्यांनी सांगितले.