आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वंदे भारत मिशन:सौदीमध्ये 200 मराठीजन अडकले, ‘वंदे भारत मिशन’चे विमानही नाही, अनेकांचा व्हिसा संपला, हातात पैसाही नाही

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सौदीच्या पूर्व प्रांतातील जुबेल, दम्माम, अल-खोबर या भागात हजारो भारतीय
Advertisement
Advertisement

कोरोनामुळे विदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने “वंदे भारत मिशन’ सुरू केले. मात्र, सौदी अरेबियात अडकलेल्या मराठी माणसाला याचा काहीच फायदा झालेला नाही. सौदीतील २०० हून जास्त मराठी नागरिक भारतात परतण्यासाठी विमानाची सोय व्हावी म्हणून राज्य आणि केंद्र सरकारला विनंती करून थकले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. व्हिसाची मुदत संपली. हातातले पैसेही संपत आले आहेत. ‘दिव्य मराठी’ने आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

सौदीच्या पूर्व प्रांतातील जुबेल, दम्माम, अल-खोबर या भागात हजारो भारतीय 

नोकरी करत आहेत. यात २०० हून अधिक महाराष्ट्रातले आहेत. कोरोनामुळे मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाली. भारत सरकारने ७ मेपासून सुरू केलेल्या “वंदे भारत मिशन’ अंतर्गत सर्वच भारतीयांना मायदेशी आणले आहे. मात्र सौदीतील महाराष्ट्रीय त्यापासून वंचित आहेत.

व्हिसाची मुदत संपली : औरंगाबादच्या न्यू विशालनगर येथील विजय वांढरे यांनी जुबेल शहरातील एका पाॅवर प्लांटवर इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर म्हणून डिसेंबर २०१७ पासून कार्यरत आहेत. त्यांचे काम ३१ मार्चला संपले. त्यांच्या फायनल एक्झिट व्हिसाची मुदत ११ जून रोजीच संपली. विनंतीनंतर त्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दम्माम येथे मार्केटिंगच्या क्षेत्रात कार्यरत मंगेश आंबटपुरे यांचा व्हिसा १९ मार्चला संपला होता. त्यांनाही मुदतवाढ मिळाली.

चार्टर्ड विमानाचीही तयारी : या नागरिकांची स्वत:च्या खर्चाने चार्टर्ड विमानाने येण्याची तयारी आहे. परंतू सरकार त्यालाही परवानगी देत नाहीये. गुजरातसाठी चार्टर्ड विमाने सुरू आहेत. मात्र, त्यात महाराष्ट्राच्या नागरिकांना परवानगी नाही. जेद्दाहहून २२ जून रोजी इंडिगो एअरलाइन्सचे विमान पुण्यात तर २९ रोजी एक विमान मुंबईला आले. यात बहुतांशी उच्चपदस्थ सरकारी आणि खासगी अधिकारी भारतात आले.

पुणे, नाशिकला सोडा : मुंबईत कोरोनाची स्थिती चिंताजनक असल्याने विमाने पाठवली नसावी. मात्र, आम्हाला पुणे, नाशिक किंवा नागपूर येथेही विमानाने सोडले तरी येथून पुढे आमच्या शहरात आम्ही कसेही पोहचू. सरकारकडे विनंती करून थकलो आहोत - विजय वांढरे, जुबेल, सौदी अरेबिया

पाठपुरावा करून थकले

महाराष्ट्रासाठी विमान मिळावे म्हणून परराष्ट्र मंत्री, नागरी विमान वाहतूक मंत्री, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे, अजित पवार, आदित्य ठाकरे यांना संपर्क साधला. अनेक ई-मेल, टि्वट केले. भारतीय दूतावासाची भेट घेतली. सौदी सरकारच्या “अबशोअर’ संकेतस्थळावर नोंदणी केली. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.

Advertisement
0