आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजी-माजी संचालक मैदनात:कृउबा समितीच्या 18 संचालकाच्या निवडणुकीसाठी 200 उमेदवारी अर्ज

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे. ३ ते ५ एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ दिला हाेता. ६ एप्रिलला अर्ज स्वीकृती व अस्वीकृत उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली. त्यानुसार संचालक होण्यासाठी दोनशे जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी १९ अर्ज अस्वीकृत झाले. त्यांनाही दाद मागण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. १८१ उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत. आजी-माजी संचालक रिंगणात उतरलेले आहेत. त्यामुळे निवडणुकीची रंगत चांगलीच वाढत चालली आहे.

संचालक मंडळाची मुदत २०२० मध्येच संपली होती. मात्र, कोरोना महामारीमुळे त्यांना मुदतवाढ दिली होती. त्यानंतर प्रशासकही नियुक्त करण्यात आले होते. भाजप व महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी सत्ता उपभोगली आहे. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून बाजार समितीवर सत्ता मिळवण्यासाठी युती व महाविकास आघाडीच्या वतीने पूर्ण ताकदीने प्रयत्न सुरू झाले आहेत. गत निवडणुकीत संजय औताडे व राधाकिसन पठाडे यांनी सत्तासमीकरणच बदलून टाकले होते. लॉटरी पद्धतीने निकाल लागला होता. ते दोघेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे जगन्नाथ काळे यांचा अर्ज जरी अस्वीकृत झाला असला तरी निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे.

२१ एप्रिलला खरे पहिलवान कळतील संचालक होण्यासाठी यंदा इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. मात्र, २० एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी वेळ दिला अाहे. या कालावधीत पट्टीचे राजकारणी अनेकांना अर्ज मागे घेऊन आपल्या गोटात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतील. म्हणजेच २१ एप्रिलला अंतिम यादी प्रसिद्ध होईल. निवडणुकीच्या मैदानातील खरे पहिलवान कोण हे मतदारांनाही कळेल.

मतदारसंघनिहाय उमेदवारी अर्जांचा आलेख मतदारसंघाचे नाव अर्ज सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ ६३ सहकारी संस्था महिला राखीव १५ सहकारी संस्था इतर मागासवर्ग १० सहकारी संस्था वि.जा./भ.ज. १३ ग्रामपंचायत सर्वसाधारण २७ ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक ०८ ग्रामपंचायत अनु. जाती-जमाती १५ व्यापारी २१ हमाल ०८