आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिफ्रेशर कोर्स:इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रिफ्रेशर कोर्समध्ये 200 जण सहभागी

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणे म्हणजे एक टीम वर्क असते. सर्जन्स, डॉक्टर्स, भूलतज्ज्ञ यांच्याबरोबरच परिचारिका वर्ग आणि वॉर्डबॉय, व्यवस्थापक किंवा इन्चार्ज या सर्वांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. तेव्हा या लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन औरंगाबाद व ओझोन अॅनेस्थेशिया ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने १९ जूनला आयएमए हॉलमध्ये रिफ्रेशर कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. यात औरंगाबादसह विविध शहरांतील रुग्णालयांमधील २०० पेक्षा अधिक लोकांनी उत्स्फूर्तपणे नोंदणी करून सहभाग घेतला. आयएमए अध्यक्ष डॉ. सचिन फडणीस, सचिव डॉ. उज्ज्वला दहिफळे, कोषाध्यक्ष डॉ. विकास देशमुख, डॉ. राजेंद्र शेवाळे, डॉ. आशिष अग्रवाल व ओझोनचे डॉ. बालाजी आसेगावकर यांच्या हस्ते सत्राचे उद्घाटन झाले. ऑपरेशन थिएटरमधील चेकलिस्ट, उपकरणांची काळजी, निर्जंतुकीकरण, कचरा व्यवस्थापनावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कोर्सचे समन्वयक डॉ. बालाजी आसेगावकर होते. उपाध्यक्षा डॉ. उज्ज्वला झंवर, डॉ. रश्मी बोरीकर, डॉ. पवन तिवारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. प्रमोद अपसिंगेकर, डॉ. सुजित खाडे, डॉ. सुजाता झिने, डॉ. शिल्पा आसेगावकर आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...