आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत बाबा हरदासराम जयंती:सिंधी समाजाची भजनसंध्या रंगली प्रभातफेरीत 200 जणांचा सहभाग

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत बाबा हरदासराम यांच्या जयंतीनिमित्त शहरात सिंधी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. बाबा हरदासराम सेवा मंडळ, अमर शहीद संत कंवरराम सेवादारी ट्रस्ट, पूज्य सिंधी उबाडो पंचायत, पूज्य सिंधी पंचायत यांच्या वतीने सिंधी कॉलनीतील कंवरधाम येथे सकाळी ६ वाजता पंचामृत स्नान घालण्यात आले. यामध्ये १०० भाविक उपस्थित होते. ७ वाजता प्रभातफेरी काढण्यात आली. यात २०० सिंधी बंधू-भगिनी सहभागी झाले होते. अल्पाेपाहाराने सांगता झाली. बीएचएस मंडळाचे पुरुषोत्तम इसराणी, अमर शहीद कंवरराम सेवाधारीचे अध्यक्ष नंदलाल तलरेजा, पंचायत चिरंजीलाल बजाज, सिंधी पंचायतचे राजू तनवाणी उपस्थित होते.

३१ जणांचे रक्तदान रक्तदान शिबिरही झाले. यामध्ये ३१ जणांनी रक्तदान केले. दत्ताजी भाले रक्तपेढीने संकलन केले. मनोहर कवरानी, किशोर काल्डा, सुनील चोटलानी, मनोहर काल्डा, अनिल केलानी उपस्थित होते.

रंगली भजनसंध्या रात्री ९ वाजता कंवरधाम मंदिरात ‘मदाह सहाब’ (आरती) झाल्यानंतर महिला मंडळाची भजन संध्या रंगली. या वेळी महिलांनी पाच किलोचा केक कापला. रेखा बजाज, अंजनाबाई तोलवाणी यांचा अग्रणी सहभाग होता.

‘मातोश्रीती’ल १५० वृद्धांसाठी जेवण मातोश्री वृद्धाश्रमातील १५० जणांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. बाबा हरदासराम यांचा संदेश होता की, तुम्ही वृद्धांची सेवा करा, तीच माझी सेवा असेल. यामुळे जाणीवपूर्वक हा उपक्रम घेण्यात आला. जळगावात महाराजांची समाधी आहे. या ठिकाणी १०० वृद्धांचा सांभाळ केला जातो. अजय तलरेजा, बांधव

बातम्या आणखी आहेत...