आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर' उपक्रम:पाचवी, आठवीच्या 2000 विद्यार्थ्यांचा असणार सहभाग; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा होणार सत्कार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिशन स्वच्छ भारत योजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंती निमित्ताने सर्व शाळांमध्ये प्रोजेक्ट "लेट्स चेंज " अंतर्गत " स्वच्छता मॉनिटर " हा उपक्रम इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना केंद्रित ठेवून राबविण्यात येणार आहे. असे एकूण जिल्हयातून दोन हजार स्वच्छता मॉनिटर केले जाणार असल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी सिताराम पवार यांनी दिली.

या उपक्रमाची सुरुवात सर्व शाळांमध्ये उद्या 02 ऑक्टोबर पासून करायची आहेत. तर 04 ऑक्टोबर रोजी स्वच्छता मॉनिटर नेमले जाणार आहेत. असेही त्यांनी सांगितले.

परिसर स्वच्छ असावा

होणारा कचरा आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही समस्या सर्वच ठिकाणी आहे. तसेच जर कुणी कचरा केला तर त्यास कचरा करू नका. कचरा हा कचरा कुंडीतच टाका असे कुणी सांगितले तर फारसे ऐकले जात नाही. नियम असूनही त्या नियमांची अमंलबजावणी होतांना दिसत नाही. कुणाला समजावून सांगायला गेलात तर लोक चुकीचा अर्थ घेतात. परंतु हीच गोष्ट जेंव्हा बच्चे कंपनी त्यांच्या पद्धतीने समजावून सांगू लागले तर त्याचा वेगळा प्रभाव होतो. तसेच शाळांतील विद्यार्थ्यांच्या अंगी स्वच्छतेची आवश्यकता निर्माण करुन परिसरात स्वच्छता टिकून राहावी. यासाठी अशी योजना सुरु करण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुलांना दाखवणार चित्रपट

या उपक्रमांतर्गत "लेट्स चेंज" चित्रपट विद्यार्थ्यांना लिंक पाठवून दाखवायचा आहे. ही फिल्म पाहिल्यावर यावर आधारित गृहपाठ उद्या 02 ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांनी फिल्म बघून त्यांना काय वाटले यावर 03 ऑक्टोबर रोजी शाळांमध्ये शिक्षकांसोबत संवाद साधूनच चर्चा करायची आहे.

मंगळवार 04 ऑक्टोबर रोजी शाळांमध्ये स्वच्छता मॉनिटर केले जातील. हे मॉनिटर कुणी एका वर्गाचा एक नसेल. तर कितीही स्वच्छता मॉनिटर नेमता येतील. त्यांनी रोज आपल्या आसपास अथवा जातांना-येतांना कुठेही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असेल कचरा कुंडीचा वापर करत नसेल. त्यांना त्यापासून अडवून जनजागृती करायची आहे. दुसऱ्या दिवशी त्यांना या कामातून काय अनुभव आला याची माहिती शाळेत शिक्षकांना द्यायची आहे.

असा आहे उद्देश -

स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि शालेय दशेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवण्यासाठी हा उपक्रम आहे. यासाठी प्रत्येक जिल्हयात एक समन्वयक नेमण्यात आला आहे. चांगले काम करणाऱ्या स्वच्छता मॉनिटरचा सत्कार करण्यात येईल. याची अमंलबजावणी सर्वांनी करायची आहे.

- एम.के.देशमुख माध्यमिक शिक्षणाधिकारी

बातम्या आणखी आहेत...