आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टाचा दणका:विनयभंग केल्याप्रकरणी कोर्ट उठेपर्यंत शिक्षा; 20 हजारांचा ठोठावला दंड

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरात घुसून महिलेचा विनयभंग करुन बदनामी केल्यास जीवे मारण्‍याची धमकी दिल्याप्रकरणात आरोपी राजकुमार रामचंद्र चौधरी (57, रा. रोहिदासपुरा, जुना मोंढा) याला एक वर्षे साधा कारवास आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी यांनी ठोठावलेली होती. याविरोधात आरोपीने दाखल केलेल्या अपिलात प्रधान जिल्हा न्‍यायाधीश वाय. जी. खोब्रागडे यांनी आरोपीचे वय पाहता त्‍याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

दंड ठोठावला

विशेष म्हणजे आरोपीला ठोठावलेला दंड पीडित महिलेला नुकसान भरपाई म्हणून देण्‍याचे तसेच प्रथम वर्ग न्‍यायालयाने ठोठावलेला आठ हजार रुपयांचा दंड शासन दरबारी जमा करण्‍याचे आदेश देखील न्‍यायालयाने दिले. प्रकरणात अतिरिक्त सरकारी लोकाभियोक्ता सुनिलकुमार बर्वे यांनी काम पाहिले.

नेमके प्रकरण काय?

दरम्यान या प्रकरणात, 43 वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती. त्‍यानुसार,19 ऑगस्‍ट 2014 रोजी पीडिता ही तिच्‍या आई व मुलासह घरात झोपलेली होती. मध्‍यरात्रीनंतर सुमारे एक ते दोन वाजेच्‍या सुमारास आरोपी राजकुमार चौधरी हा पीडितेच्‍या घरी आला. त्‍याने दार वाजवून पीडितेला उठवले. पीडितेने इतक्या रात्री तुझे काय काम आहे असा प्रश्‍न उपस्थित केला. त्‍यावर आरोपीने इतक्या रात्री माणुस कशासाठी येतो हे तुला समजत नाही का असे म्हणत पीडितेचा हात पकडला. व मी तुझ्यावर दोन वर्षांपासून प्रेम करतो, तुला कळत नाही का, तू माझा विचार कर मी समाजाचा प्रतिष्‍ठीत नागरिक आहे. तू माझे ऐकले नाही व बदनामी केली तर तुला जीवंत सोडणार नाही आशी धमकी देत पीडितेचा विनयभंग केला.

पीडितेला रक्कम द्या

प्रकरणात जिन्‍सी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. उपरोक्त प्रकरणात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आरोपीस एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती त्याविरोधात आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी उपरोक्त प्रकरणे आरोपीच्या बाजूसही सरकारी पक्षाची बाजूही ऐकून घेतली आणि आरोपीच्या वयाचा आणि एकंदरीत विचार करता जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांची शिक्षा रद्द केली आणि आरोपीला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा दिली आर्थिक दंडापोटी 20 हजार रुपये रक्कम त्याने पीडितेस देण्यात यावी असेही कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे

बातम्या आणखी आहेत...