आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:दुसऱ्याच दिवशी जिल्ह्यातील 206 शाळा बंद; शिक्षक शाळेत येत येत नसल्याचा परिणाम

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनानंतर २३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मंगळवारी (दि. २४) ग्रामीण भागातील ६६९ पैकी २०६ शाळा बंदच होत्या. ४६३ शाळांमध्ये मंगळवारी २० हजार ५२४ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे. शिक्षकांना आरटीपीसीआर कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आल्याने त्याचा अहवाल येईपर्यंत शिक्षक शाळेत येत येत नसल्याचा हा परिणाम शाळांवर दिसून येत असल्याचे म्हटले आहे.

देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव यामुळे मार्च महिन्यात परीक्षा न घेताच शाळा बंद करण्यात आल्या होत्या. तब्बल आठ महिन्यांच्या अंतरानंतर शासनाने २३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरु करण्यात आले आहेत. त्यासाठी सर्व शिक्षकांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. ज्या शिक्षकांनी तपासणी केली आहे. त्या शिक्षकांना प्रमाणपत्र सादर करुन हजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, बंद शाळेवरील शिक्षकांनी अद्याप कोरोना चाचणी केलेली नाही; तर काही शिक्षकांनी चाचणी केलेली आहे, मात्र रिपोर्ट न आल्यामुळे त्या शिक्षकांना शाळेत येता येत नाही. परिणाम विद्यार्थी शाळेत येत असो वा नसो शिक्षक ५० टक्के शाळेत येणे अपेक्षित आहे. मात्र मंगळवारी २०६ शाळा या बंद होत्या. या विषयी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांना विचारणा केली असता, कोरोना चाचणी अनिवार्य आहे. आरटीपीसीआरचा रिपोर्ट येण्यास एक दिवस लागतो. त्यामुळे काही शाळांमध्ये शिक्षक आले नाहीत. अशा २०६ शाळा त्यामुळेच बंद होत्या. परंतु मोठ्या प्रमाणात शिक्षकांची कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केली आहे असेही चव्हाण म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser