आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

224 रस्त्यांसाठी 207 कोटींचा निधी मंजूर:औरंगाबादेताल रस्ते होणार चकाचक-पालकंमंत्री सूभाष देसाई

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहरासाठी स्मार्टसिटी योजनेंतर्गत शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी महापालिकेच्यावतीने सोमवार 7 जून रोजी 207 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यामुळे शहरावासियांना मोठ्या प्रमाणावर नवीन रस्ते मिळणार आहे. या निमित्ताने शहरातील 224 रस्ते चकाचक होतील, असा विश्वास पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

शहरातील रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी स्मार्ट सिटी योजने अंतर्गत रस्ते विकासासाठी महापालिकेने यापूर्वी 317 कोटी मंजूर केले आहेत. सोमवारी झालेल्या बैठकीत मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी आता आणखी 224 रस्त्यांसाठी महापालिकेच्या वतीने 207 कोटी रुपये मंजूर केले. असे एकूण 524 कोटी रुपये केवळ रस्त्यासाठी खर्च होत आहेत. राज्य शासनाने यापूर्वीही मोठ्याप्रमाणावर शहरातील रस्ते तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता.

त्या निधीतून शहरातील विविध प्रमुख रस्ते तसेच अंतर्गत रस्त्याचे काम करण्यात आले होते. तसेच इतर रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी स्थानिक आमदारांनी पाठपुरावा सुरू केला होता. त्याला यश मिळाले आहे. आता पुन्हा निधी मंजूर केल्याने शहरातील अनेक रस्त्यांची समस्या सुटणार आहे. निधी मंजूर केल्याने या निमित्ताने शहरातील नागरिकांना चकाचक रस्ते मिळणार आहेत.अशी प्रतिक्रिया पालक मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

शहरात रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी स्थानिक आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, आंबादास दानवे यांच्या सततच्या पाठपुरावा केला होता. त्यानंतर महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी हा निधी मंजूर केला. दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठिंब्याने शहरासाठी ही भेट देताना आनंद होत असल्याची भावना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...