आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाड-पागे समिती:सफाई कामगारांच्या 21 मुलांना मिळणार नोकरी ; मनपा सेवेत नोकरी देण्यात येणार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या लाड-पागे समितीच्या ३५ प्रकरणांवर सुनावणी घेत यापैकी २१ कुटुंबांतून आलेल्या प्रस्तावांना अखेर मंजुरी देण्यात आली. सफाई मजुरांच्या कुटुंबातील या व्यक्तींना लवकरच मनपा सेवेत नोकरी देण्यात येणार आहे. मनपात सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत किंवा सेवानिवृत्तांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस पालिकेत नोकरी दिली जाते.

यासंबंधी निर्णय घेण्यासाठी प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, आस्थापना अधिकारी व मुख्य लेखाधिकारी यांची समिती गठित केली आहे. या समितीची मागील महिन्यात बैठक झाली. त्यात सफाई कर्मचाऱ्यांनी नामनिर्देशित केलेल्या व्यक्तींना नियुक्ती देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. १० प्रकरणे कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी पुढील बैठकीत ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...