आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 जणांचे घेतले जबाब:विद्यार्थिनीने रिक्षातून उडी मारल्याप्रकरणात 213 पानांचे दोषारोपपत्र, 33 साक्षीदार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिक्षाचालकाने अश्लील प्रश्न विचारून वाईट हेतूने संवाद सुरू केल्याने १७ वर्षांच्या विद्यार्थिनीने चालत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी घडली होती. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणात क्रांती चौक पोलिसांनी २० दिवसांमध्ये दोषारोपपत्र तयार करत सखोल तपास केला. आरोपीवर गुन्हा सिद्ध होण्यासाठी वर्धन व कशिश खून प्रकरणाप्रमाणे जीआयएस व जीपीएस प्रणालीच्या आधारे पोलिसांनी पुराव्यांचा या दोषारोपपत्रात समावेश केला, हे विशेष.

१३ नोव्हेंबर रोजी नीटचा क्लास संपवून नेहा (नाव काल्पनिक) गोपाल टी पॉइंटवरून रिक्षातून घरी जात हाेती. तेव्हा विकृत रिक्षाचालक सय्यद अकबर सय्यद हमीद (३९, रा. पडेगाव) याने अश्लील प्रश्न विचारणे सुरू केल्याने घाबरून तिने चालत्या रिक्षातून उडी मारली. सिल्लेखाना चौकात ही घटना घडली. नेहावर एमजीएम रुग्णालयात दहा दिवस उपचार सुरू होते. प्रकृती सुधारल्यानंतर तिला घरी पाठवण्यात आले. पोलिसांनी बारा तासांत सय्यद अकबरला अटक केली होती.

जीपीएस व जीआयएसचा समावेश : नेहा रिक्षात बसल्यापासून ते उडी मारेपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम जुळवून गुन्हा भक्कम करण्यासाठी पोलिसांनी जीपीएस व जीआयएस (जिओग्राफिक इन्फर्मेशन सिस्टिम) प्रणालीचा उपयोग करत दोषारोपपत्रात त्याचा समावेश केला. यापूर्वी शहरात झालेल्या वर्धन घोडे व देवगिरी महाविद्यालयाची विद्यार्थी कशिश हत्या प्रकरणात या प्रणालीचा पोलिसांनी वापर केला होता. ३३ साक्षीदार, त्या दोन चालकांचा घेतला शोध : पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी तीस दिवसांच्या आत योग्य तपास करून दोषारोपपत्र तयार करण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठ निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल सोनवणे, विकास खटके, अंमलदार बालाजी तोडेवाड, पद्मसिंग कोळेकर यांनी २० दिवसांत अकबरविरोधात भक्कम पुरावे गोळा केले. त्यात ३३ साक्षीदारांचा समावेश आहे. १८ जणांचा जबाब नोंदवत २१३ पानांचे दोषाराेपपत्र तयार केले.

पोलिसांनी पहिल्या दिवसापासून जुळवला घटनाक्रम {घटनेदरम्यान रिक्षामागून जाणारा कारचालक व दुचाकी चालकाचा शोध घेतला. ते प्रमुख साक्षीदार. {नेहावर उपचार केलेल्या डॉक्टरांच्या उपचाराच्या अहवालाचा दोषारोपपत्रात समावेश. {अकबरची कारागृहात ओळख परेड झाली. नेहाने त्याला ओळखले. {अकबरने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तेव्हाही नेहाचा न्यायालयात जबाब नोंदवण्यात आला. तेव्हाही नेहाने जबाब दिला. त्यामुळे न्यायालयाने अकबरचा जामीन फेटाळला. {घटनाक्रम जुळवण्यासाठी पाच महत्त्वाचे सीसीटीव्हीचे फुटेज. {अकबर रिक्षा चालवत होता हे सिद्ध करण्यासाठी त्याने रिक्षामालकासोबत केलेला करार, पत्नीच्या खात्यावरून ३०० रुपये पाठवलेले बँकेचे स्टेटमेंट अधिकृत करून घेतले.

बातम्या आणखी आहेत...