आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालविवाह:12 वर्षाची नवरी मुलगी अन् 18 वर्षाचा होता नवरा मुलगा, मार्च ते जून दरम्यान महिला व बालकल्याण विभागाने थांबवले 22 बालविवाह

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वयात आली म्हणजे मोठी झाली हा समज, खर्च कमी येतो असे कारण दाखवत बालविवाह
  • बालविवाह थांबविण्यात औरंगाबाद जिल्हा दुसऱ्या स्थानावर

लॉकडाऊन, शाळा-महाविद्यालये बंद मार्च ते जून या कालावधीत लग्न सराई जोरात असते. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव यामुळे अनेक ठिकाणी शहरासह गावांमध्ये विवाह झाले. पण या सर्वात मोठी समस्या म्हणजे बालविवाह छुप्या पद्धतीने होत होते. अशा आलेल्या तक्रारीवरून औरंगाबाद जिल्हयातील एकूण २२ बालविवाह लावण्याचा प्रयत्न औरंगाबाद जिल्हा महिला व बालकल्याण विभागाने हाणून पाडला असून, माहिती देणारे आणि पोलिसांच्या सहकार्याने हे बालविवाह थांबविण्यात आले. ज्यात एका प्रकरणात तर १२ वर्षाची नवरी मुलगी आणि १८ वर्षाचा नवरा मुलगा असल्याचे समोर आले. बालविवाह थांबविण्यात महाराष्ट्रात सोलापूर प्रथम तर औरंगाबाद दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव यामुळे यंदा परीक्षा न घेता शाळा-महाविद्यालयांना सुट्या देण्यात आल्या होत्या. तसा मार्च ते जून हा कालावधी सुट्या आणि लग्नसराईचा काळ. त्यात शाळा बंद, अनेकांचे रोजगार लॉकडाऊनमध्ये गेले, ग्रामीण भागात नेहमीचाच दुष्काळ. वयात येणाऱ्या मुली आई-बाबांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावते. सुरक्षेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बालविवाह केले जातात. सध्याच्या घडीला हजार मुलांच्या मागे ८३२ मुलींची संख्या आहे. अशी परिस्थिती असतांना तर लॉकडाऊनच्या काळात या बाल विवाहाच्या मोठ्या घटना समोर आल्यात. ज्यात अर्ध्या रात्रीत छुप्या पद्धतीने देखील लग्न झाले. मात्र या सर्वांमध्ये पोलीस पाटील, गावातील परिचित, चाइल्ड लाइन आणि मिळालेल्या माहितीसह पोलिसांच्या सहकार्याने औरंगाबाद जिल्हा महिला व बालकल्याण विभागाने २२ बालविवाह थांबवले. काही ठिकाणी तर गावात जिथे बालविवाह होत आहे. अशी माहिती दोन गावात समज देवूनही बालविवाह लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे संरक्षण अधिकारी दीपक बजरे आणि कल्पना निकम यांनी सांगितले. या मोहिमेत महिला व बालकल्याण अधिकारी हर्षा देशमुख, महादेव डोंगरे यांचे पाठबळ आणि मार्गदर्शन होते असेही अधिकारी म्हणाले. निपाणी गावातील घटनेत तर तर १२ वर्षांची नवरी मुलगी आणि १८ वर्षाचा नवरा मुलगा होता. ही माहिती मिळताच पोलिसांच्या आणि पोलीस पाटीलच्या सहकार्याने समुपदेशनाद्वारे बालविवाह रोखण्यात आल्याचे अधिकारी म्हणाले. मार्च ते जून दरम्यान एकूण २२ घटना समोर आल्या ज्या इतर नेहमीच्या वेळेपेक्षा सर्वाधिक होत्या. महाराष्ट्रातून या लॉकडाऊनच्या काळात सोलापूर हे बालविवाह थांबविण्यात पहिले ठरले तिथे २४ बालविवाह रोखण्यात आले तर दुसऱ्या स्थानावर आपला औरंगाबाद जिल्हा राहिल्या इथे २२ बालविवाह थांबविण्यात आले.

ही कारणे समोर आली

दरम्यान अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनमध्ये अनेकांचा रोजगार गेला होता. प्रामुख्याने ग्रामीण भागात तर मुलींच्या सुरक्षेच्या नावाखाली आणि आजही मुलगी वयात आली म्हणजे लग्नायोग्य झाली हा समज आहे. तर गावातील काही घटनांमुळे आपल्या मुलीच्या बाबतीतही असं झाल तर मुलींवर अविश्वास, सोशल मीडियाचा वाढता प्रभाव यामुळे बालविवाह होत असल्याचे समोर आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुलींचे प्रमाण आजही मुलांच्या तुलनेत कमी आहे. तरी देखील बालविवाह थांबलेले नाहीत. या लॉकडाऊनच्या काळात आपल्या जिल्हयातील २२ घटना समोर आल्या. ज्यात माहित मिळताच बालविवाह थांबविण्यात आले. दोन बालविवाह हे लॉकडाऊन पूर्वी आणि वीस लॉकडाऊनच्या काळातील आहेत. ज्यात तीन शहरी भागातील समावेश आहे. समज गैरसमज मुलगी वयात आली तर विवाह योग्य झाली असे समजणारे लोक आहेत. अशावेळी माहिती मिळताच प्रत्यक्ष जावून स्थानिक प्रशासन, पोलीस आणि गावातील पोलीस पाटील चाईल्ड लाईन यांच्या सहकार्याने समुपदेशनाद्वारे बालविवाह थांबविण्यात येतात - दीपक बजरे संरक्षण अधिकारी महिला व बालकल्याण विभाग

शाळा न सुरु झाल्यास पुन्हा बालविवाह -

दरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितले की, शाळा सुरु असल्यावर मुलींमध्ये चर्चा होते. शिक्षकांपर्यंत ताबडतोब माहिती जाते. परंतु शाळा बंद आहेत कधी सुरु होतील यावर अद्याप निश्चित वेळ ठरलेली नसल्याने आता पुन्हा दिवाळी नंतर बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जागरुक्ता महत्त्वाची आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser