आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तिरचना:‘विठ्ठला’ची मैफल 22 डॉक्टरांनी गाजवली ; ‘गजर विठ्ठलाचा’ सोहळा उत्साहात पार

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कायमच रक्त आणि वेदनेच्या सावटात राहूनही ईश्वराच्या साक्षीने रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यासाठी कौशल्य पणाला लावणाऱ्या डॉक्टरांनी दोन-अडीच तासांच्या सादरीकरणात श्रेात्यांना पंढरपूरची सफर घडवली. आषाढीनिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे सभागृहात रंगलेला ‘गजर विठ्ठलाचा’ सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमात विविध शाखांच्या २२ डॉक्टरांनी भक्तिरचना सादर केल्या. माइलस्टोन ठरलेले ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’म्हणत डॉ. जय तोष्णीवाल यांनी साकडे घातले. यानंतर कर्करोगतज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल जटाळे यांनी ‘विठू माउली तू माउली जगाची’गायले. डॉ. अनघा शेरकर यांचे ‘आकाशी झेप घे रे पाखरा..’ गाणेही दाद मिळवणारे होते. सादरीकरणात डॉ. रमेश सातारकर, डॉ महेश जंबुरे, डॉ. सुनील देशमुख, डॉ. अतुल पोरे, डॉ. अशोक शेरकर, डॉ. आनंद सोनी, डॉ. अक्षय मारावार, डॉ. वर्षा आपटे, डॉ. सोनाली सावजी, डॉ. सुचेता पत्की, डॉ. श्रुतींचंद्रा उबाळे, डॉ. शिल्पा सातारकर, डॉ. यशस्विनी तुपकरी, डॉ. अनघा वरूडकर आदींच्या स्वरांनी रंग भरले.

बातम्या आणखी आहेत...