आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरघोस मदत:शिक्षकांना 22 लाखांचे कर्ज ; शिक्षक पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत ठरावाला दिली मंजुरी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जि.प. शिक्षक पतसंस्थेच्या सभासदांना आता २२ लाखांचे कर्ज मिळणार आहे. तसा ठराव रविवारी झालेल्या ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. शिक्षक सभासदांनी पतसंस्थेच्या उपविधी दुरुस्तीबाबत प्रश्न विचारून कर्ज मर्यादा वाढवणे, संचालक संख्या १३ वरून १७ करणे, कल्याण निधीतून मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना भरघोस मदत करणे, दिव्यांग शिक्षकांसाठी पतसंस्थेत लिफ्टची सुविधा देण्याची मागणी केली. भाड्यापोटी पतसंस्थेत ५ लाख रुपये जमा होत आहेत, असे संचालकांनी सांगितले. सभेत विविध ठराव बहुमताने मंजूर करण्यात आले. सभासदांना कर्ज मर्यादा २० लाखांवरून २२ लाख करणे, १ कोटी ३१ लाख ९७ हजार ९०८ रुपये नफा वाटपास मान्यता, कार्यक्षेत्राबाहेरील नियमित कर्ज फेडणाऱ्यांना कर्ज देण्यास मंजुरी आदी ठराव मंजूर करण्यात आले.

गैरकारभारविरुद्ध घोषणाबाजी
सभेला ११०० पैकी अवघे १९६ सभासद उपस्थित होते. सदस्यांनी विविध मुद्दे उपस्थित केल्यानंतर चेअरमन, सचिवांना उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे सभासदांनी कार्यकारी संचालक मंडळाच्या गैरकारभारविरुद्ध घोषणा देऊन सभात्याग केला. दोषींवर कारवाईची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...