आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासतत टोमणे, १५ लाख रुपयांसाठी सुरू असलेल्या छळाला कंटाळून अश्विनी कुणाल देहाडे (१९) हिने बेडरूमच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली होती. मंगळवारी दुपारी ३ वाजता वाल्मी परिसरातील सैनिक विहार अपार्टमेंटमध्ये घडलेल्या घटनेत सातारा पोलिसांनी तिचा पती कुणाल (२२), सासरा विक्रम, सासूवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कुणालला अटक केली आहे. मूळ पांढरी पिंपळगावच्या असलेल्या अश्विनीचा पाच महिन्यांपूर्वी कुणालसोबत विवाह झाला होता. वाल्मीच्या विरुद्ध दिशेला असलेल्या व्हिजन सिटीत राहणाऱ्या कुणालच्या वडिलांचे वाळूजला प्रॉडक्शन युनिट आहे. तो तेथेच काम पाहतो. लग्नानंतर सतत टोमणे मारणे, माहेरवरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकण्याचे प्रकार सुरू झाले. ६ जून रोजी पुन्हा त्यांच्यात वाद झाले. हा प्रकार अश्विनीने आई-वडिलांना सांगितला. त्यामुळे ७ जून रोजी अश्विनीचे आई-वडील, काका-काकू व भाऊ सकाळी मुलीच्या सासरी दाखल झाले. त्यांच्यात चर्चा सुरू झाली. मात्र, अश्विनी तिच्या खोलीत निघून गेली. घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, सहायक निरीक्षक सुनील कराळे, उपनिरीक्षक शंकर शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री अकरा वाजता अश्विनीचे वडील संजय अण्णा साळवे (४२) यांच्या तक्रारीवरून कुणाल व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रात्रीतून कुणालला पोलिंसाकडून अटक करण्यात आली.
आई-वडील हाॅलमध्ये, अश्विनीने खाली उडी मारली आई-वडील, भाऊ समोरच्या खोलीत असताना अश्विनीने खोलीत जाऊन दरवाजा लावून घेतला. नंतर सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारली. काही क्षणात मोठा आवाज झाला. पार्किंगमधून आरडाओरड सुरू झाली. काय झाले हे कळण्याच्या आत अश्विनीने तिच्या खोलीच्या गॅलरीतून उडी मारल्याचे पाहून कुटुंबाला धक्काच बसला. त्यांनी खाली धाव घेतली. रक्तबंबाळ अवस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोके फुटून हात, पाय मोडल्याने तिचा जागीच मृत्यू झालेला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.