आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करार:तिघांच्या भागीदारीतील कंपनीची 23 लाख 58 हजारांची फसवणूक

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील तीन व्यावसायिकांच्या भागीदारीतील सरकारी व खासगी बांधकामाचे कंत्राट घेणाऱ्या कंपनीला कोलकात्याच्या कंपनीने २३ लाख ५८ हजारांची फसवणूक केली. एम. एस. स्टील प्लेट पुरवण्याचा ८१ लाख ४२ हजारांत करार ठरलेला असताना पुरवठा न करता जीएसटी रक्कमही अदा केली नाही. याप्रकरणी कोलकात्याच्या अशरज स्टील उद्योगाचे संचालक विवेक शॉविरोधात जवाहरनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी अनुज अग्रवाल (४०, रा. दिवाण देवडी) यांनी फिर्याद दिली. अग्रवाल यांची त्यांचे मित्र जयेश ठक्कर व अशोक शहा यांच्या भागीदारीत श्रीकृष्ण इन्फ्राटेक नावाची फर्म आहे. या कंपनीमार्फत ते खासगी व सरकारी बांधकामाचे कंत्राट घेतात. २०२१ मध्ये त्यांच्या कंपनीला रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडून एम. एस. पाइपलाइन बनवण्याचे कंत्राट मिळाले होते. त्यासाठी एम. एस. स्टील प्लेटची गरज असल्याने अग्रवाल यांनी शॉच्या कंपनीने कमी दरात चांगल्या दर्जाचे स्टील पुरवण्याची हमी दिली होती. त्यात ८१ लाख ४२ हजारांत पुरवठा करण्याचे ठरले. त्यानुसार अग्रवाल यांच्या कंपनीने दोन टप्प्यात जीएसटीसह एकूण ४९ लाख १७ हजार ८०९ रुपये शॉला दिले.

गुंडांना सुपारी देऊन संपवून टाकण्याची दिली धमकी शॉने पैसे प्राप्त होऊनही ठरलेल्या वेळेत पुरवठा केला नाही. एप्रिलमध्ये खोटे बिल पाठवून माल मिळण्याचे आश्वासन दिले. सतत पाठपुरावा केल्यानंतर त्याने अग्रवाल यांना २५ लाख ५९ हजार ७५३ रुपयांचा स्टीलचा पुरवठा केला. मात्र, त्यानंतर संपर्क बंद केला. अग्रवाल यांनी आगाऊ रक्कम भरताना जीएसटीसह मागणी केली. मात्र, शॉने रक्कम जीएसटी विभागाला न भरल्याने श्रीकृष्ण इन्फ्राटेकला जीएसटी रकमेचा सेटऑफ घेता आला नाही. वारंवार पैसे किंवा मालाची मागणी केल्यानंतर मात्र शॉ धमक्यांवर उतरला. गुंडांना सुपारी देऊन संपवून टाकेल, काहीच भेटणार नाही, अशी धमकी देऊ लागला. शिवाय, खोटे बिल, ई-वे बिल, जीएसटी भरलेले चलनचे बनावट कागदपत्र दिले. शॉने अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे अग्रवाल यांनी तक्रारीत म्हटले आहे. निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष राऊत तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...