आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे स्मार्ट मिशन:23 रस्त्यांची कामे तीन महिन्यांत; 100 कोटींत 81 रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिल्याच पावसात अनेक रस्ते नेहमीप्रमाणे खड्ड्यात गेले. वाहनचालकांचे हाल सुरू झाले. त्यांना दिलासा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न होत आहे. जूनमध्येच २३ रस्त्यांच्या नूतनीकरणाचे काम सुरू होत आहे. पावसाळा संपताना म्हणजे तीन महिन्यांनी ते पूर्ण होईल. २३ पैकी दोन रस्त्यांचे काम १६ जून रोजी सुरू झाले. २१ कामे २० जूनपासून सुरू होतील, अशी माहिती स्मार्ट सिटी रस्ते प्रकल्पाचे समन्वयक इम्रान खान यांनी दिली. याशिवाय पुढील वर्षभरात १०० कोटी रुपयांतून ८१ रस्त्यांचा चेहरा बदलला जाईल. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत १०७ रस्त्यांचे काम मुंबई आयआयटीच्या निगराणीखाली होणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन रस्त्यांची कामे होतील. त्याचे डिझाइन आयआयटीच्या तज्ज्ञांनी तपासून मंजूर केले. त्यामुळे शुक्रवारपासून भाग्यनगर व स.भु. कॉलेजसमोरील रस्ता नूतनीकरण सुरू होईल. दोन ते तीन आठवड्यांत हे काम पूर्ण होणार आहे. २० जूनपर्यंत इतर २१ रस्त्यांचे डिझाइन अंतिम होणार आहे. यात प्रामुख्याने दयनीय अवस्थेतील रस्त्यांचा समावेश आहे. दीड ते तीन महिन्यांत काम पूर्ण करण्यात येईल. या कामावर आयआयटीच्या पथकाची नजर राहील. हे पथक मनपा अभियंते, ठेकेदार व पीएमसीला प्रशिक्षणही देईल. सर्व कामे ए.जी. कन्स्ट्रक्शन कंपनी करणार आहे.

८१ रस्त्यांच्या निविदा २८ जूनला उघडणार
मनपाने अर्थसंकल्पात १०० कोटी रुपये रस्त्यांसाठी राखून ठेवले. त्याचे ५० कोटींचे दोन पॅकेज तयार केले आहेत. यातून ८१ रस्त्यांचे अंदाजपत्रक बनवण्यात आले आहे. २८ जून रोजी या निविदा उघडल्या जाणार आहेत, अशी माहिती मनपातील सूत्रांनी दिली. महापालिका आणि स्मार्ट सिटी मिळून ५२५ कोटी रुपये खर्चात २६६ किमी लांबीचे रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

महानगरपालिकेच्या निधीतून होणार हे रस्ते
१. उद्धवराव पाटील चौक ते प्रस्तावित सिटी सर्व्हे प्रबोधिनीपर्यंत
२. हॉटेल व्हिट्स ते हॉटेल पेशवा व एमआयडीसी कार्यालय
३. रोजाबाग भारतमातानगर, संत सेना भवन ते गणपती विसर्जन विहीर
४. सुरेवाडी, गोकुळनगर, पहाडसिंगपुराअंतर्गत तळेश्वर मंदिर ते बेगमपुरा स्मशानभूमी ते आसाराम बापू आश्रम
५. सातारा गावातील पेशवेनगरात काँक्रिटीकरण
६. सातारा-देवळाई संभाजीराजे चौक ते भारतनगरकडे
७. सातारा-देवळाई बीड बायपास रोड ते म्हाडा कॉलनी
८. नक्षत्रवाडी नक्षत्र पार्क व म्हाडा कॉलनी
९. पारिजातनगरात व्हाइट टॉपिंग
१०. गुलमोहर कॉलनी, सिडको एन-५ धर्मवीर संभाजी विद्यालय ते जळगाव रोड व सावरकरनगर

बातम्या आणखी आहेत...