आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:औरंगाबाद, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातून चोरलेल्या 23 दुचाकी जप्त, चौघे जण पोलिसांच्या ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या प्रकरणात आणखी दुचाकी सापडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली

औरंगाबाद, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातून दुचाकी चोरी करून स्वस्तात विक्री करणाऱ्या टोळीचा हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने भांडाफोड केला असून या प्रकरणात चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १५ लाख रुपये किंमतीच्या २३ दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणात आणखी दुचाकी सापडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे प्रकार वाढले होते. त्यामुळे पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणात लक्ष घालण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेने जिल्हाभरातून माहिती काढण्यास सुरवात केली. त्यामध्ये आखाडा बाळापूर व वसमत परिसरातील गावांमध्ये स्वस्तात दुचाकी विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार बालाजी बोके, संभाजी लकुळे, भगवान आडे, विलास सोनवणे, शंकर जाधव, विशाल घोळवे, आशिष उंबरकर, विठ्ठल कोळेकर, सुनील अंभोरे यांच्यासह पोलिसांनी पथके तयार करून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यास सुरवात केली. या प्रकरणात पोलिसांनी वसमत येथील शेख मुर्तुझा शेख मन्नान, उमेरखा बिस्मीलाखाँ, बंगा बालाजी डोईजड व आखाडा बाळापूर येथील शेख अझर शेख दिल्लू यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी औरंगाबाद, नांदेड व हिंगोली जिल्हयातून दुचाकी चोरी करून स्वस्तात विक्री केल्याचे कबुल केले आहे. पोलिसांनी या सर्व २३ दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी सुरु केली असून त्यांच्या कडून आणखी दुचाक वाहने सापडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरी बद्दल पोलिस अधिक्षक कलासागर यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...