आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय:प्राध्यापकांच्या संपामुळे घाटीतील 23, कॅन्सर हॉस्पिटलमधील 2 शस्त्रक्रिया रद्द

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांचे आंदोलन चिघळत चालले आहे. सोमवारी घाटीत सर्व प्राध्यापक आंदोलनात सहभागी झाल्यामुळे नियोजित २३ तर कॅन्सर हॉस्पिटलमधील २ शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्याची माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांनी दिली. घाटीत अधिष्ठातांच्या कार्यालयासमोर मंडप टाकून आंदोलन करण्यातआले. घाटीत वरिष्ठ डॉक्टर नसल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतआहे. सोमवारी ओपीडीत १७७६ रुग्ण तपासण्यात आले, तर ३० पैकी २३ शस्त्रक्रिया रद्द करण्यातआल्या. केवळ ७ अत्यावश्यक शस्त्रक्रिया वरिष्ठ डॉक्टरांनी केल्या. कान, नाक, घसा, डोळे तसेच हाडांच्या शस्त्रक्रिया रद्द करण्यातआल्याचे डॉ. विकास राठोड यांनी सांगितले. शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमधील दोन शस्त्रक्रिया रद्द केल्याचे डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले. आंदाेलनावेळी डॉ. भारत सोनवणे, उपअधिष्ठाता डॉ. सिराज बेग, डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. कैलास झिने, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. वर्षा देशमुख, डॉ. संगीता पाटील, डॉ. अर्चना राठोड, डॉ. प्रभा खैरे, डॉ. सदानंद बीडकर, डॉ. अर्चना राठोड, डॉ. मारुती लिंगायत, डॉ. अदिती लिंगायतआदींची उपस्थिती होती.

वैद्यकीय मंत्रालयाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष
दोन आठवड्यांपासून प्राध्यापकांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांपासून ते सचिव पातळीवर कुठलीही चर्चा होताना दिसत नाही. त्यामुळे मागण्यांविषयी सरकार गंभीर नसल्याचा डॉक्टरांचा आरोप आहे.

बातम्या आणखी आहेत...