आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:उद्या औरंगाबाद जिल्ह्यातील 23 हजार 511 विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद जिल्ह्यातून इयत्ता पाचवीचे 14 हजार 339; तर आठवीचे 9 हजार 172 असे एकूण 23 हजार 511 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट

महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेकडून इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी उद्या गुरुवारी दि. 12 ऑगस्ट रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागाद्वारे परीक्षेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

यंदा महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातून इयत्ता पाचवीचे 14 हजार 339; तर आठवीचे 9 हजार 172 असे एकूण 23 हजार 511 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. दरवर्षी पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी घेण्यात येते. परंतु, कोरोनामुळे या परीक्षेचे नियोजन कोलमडले आहे. आता पर्यंत या परीक्षेची तारीख सहा वेळा बदलण्यात आली आहे. अखेर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 12 ऑगस्ट ही तारीख निश्‍चित केली आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी) परीक्षेसाठी जिल्ह्यातील 146 केंद्रे व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षेसाठी 108 अशा एकूण 254 केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. पाचवी आणि आठवीसाठी पहिला पेपर सकाळी 11 ते 12.30 आणि दुसरा पेपर दुपारी 1.30 ते 3 वाजेपर्यंत होईल.

बातम्या आणखी आहेत...