आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:कोरोनाने कुणाचे वडील तर कोणाची आई हिरावून घेतली, कोरोनाने औरंगाबाद जिल्ह्यातील 234 बालके पोरकी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील एक पाच वर्षांची चिमुकली व एका आठ वर्षांच्या मुलाने आपले वडील गमावले.

कोरोनाचा संसर्ग होऊन कोणाचे वडील तर कोणाची आई हेरावून घेतली आहे. अशी औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 234 बालके असून 9 चिमुकल्यांचे आई आणि वडीलही राहिले नसून त्यांच्या वाटेला पोरकेपणा आला आहे. वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील एक पाच वर्षांची चिमुकली व एका आठ वर्षांच्या मुलाने आपले वडील गमावले. ही दोघही मुल अल्पभूधारक शेतकरी वर्गातील असून त्यांच्या वडिलांचा मृत्यू कोरोनाने झाल्याची माहिती आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारपर्यंत 234 बालके ही एक पालक असल्याची नोंद झाली आहे. तर 9 मुलांना आता आई आणि वडीलही राहिलेले नाहीत.

जिल्ह्यात सध्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांच्यासह ग्रामरक्षक कृती दलाच्या माध्यमातून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या 18 वर्षांपेक्षा लहान मुलांचे सर्वेक्षण सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात झपाट्याने झाल्याने अनेक लहान मुलांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. औरंगाबाद विभागातील एकपालक किंवा आई व वडील नाहीत, अशा 18 वर्षांखालील मुलांचे सर्वेक्षण सुरूच असून अद्याप आकडेवारी संकलित झाली नसल्याचे महिला व बालविकास विभागाच्या प्रभारी उपायुक्त हर्षा देशमुख यांनी सांगितले.

महिला व बालविकास विभागाकडून कोरोनामुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांच्या मदतीसाठी 1098 हा चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक असून त्यावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...