आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल भरणाऱ्यांसाठी बक्षिसे:वेळेवर बिल भरणाऱ्या 238 जणांना महावितरणची बक्षिसे

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नियमित बिल भरणाऱ्यांसाठी महावितरणने मिक्सर, मोबाइल, टीव्ही, फ्रिज आणि इलेक्ट्रिक स्कूटर आदी बक्षिसे सोडत पद्धतीने देण्याची योजना सुरू केली आहे. जून महिन्यातील सोडतीत २३८ जणांना बक्षिसे मिळाली. मराठवाड्यातील १०१ उपविभागांतून हजार रुपयांपर्यंतची प्रत्येकी २ बक्षिसे वस्तु स्वरूपात दिली जातात. एक बक्षीस वेळेवर बिल देणाऱ्या आणि दुसरे अंतिम मुदतीच्या आत बिल देणाऱ्यास असेल. बिल तयार झाल्यापासूनच्या सात दिवसांत भरल्यास

सुमारे एक टक्का तत्पर देयक भरणा सूट, ऑनलाइन बिल भरल्यास ०.२५ टक्के सूट दिली जाते. त्यात बक्षिसांची भर पडली आहे. जुलैची सोडत १० ऑगस्ट तर ऑगस्टची सोडत १० सप्टेंबरला काढण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...