आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षाघातांच्या रुग्णांसाठी मार्गदर्शन:औरंगाबादेत 24 तास मोफत हेल्पलाइन सेवा; गोल्डन अवरमध्ये मदतीसाठी मिळणार मार्गदर्शन

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पक्षाघात हे जगभरातील मृत्यू आणि अपंगत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण आहे. या आजारात केवळ रुग्णांवर नव्हे तर संपूर्ण कुटुंबावर परिणाम होतो. असे असताना ओरियन सिटी केअर च्या डॉक्टर पांडुरंग वट्टमवार यांनी एक हेल्पलाइन तयार केली असून यामध्ये रुग्णांना कशी मदत होईल याचे मार्गदर्शन या हेल्पलाइनच्या माध्यमातून मोफत केले जाणार आहे.

समाजातील पक्षाघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रतिबंध, उपचार आणि जागरुकता यामध्ये सतत सुधारणा करण्याचे डॉ. वट्टमवार यांचे ध्येय आहे. डॉ. पांडुरंग वट्टमवार यांच्या न्युरोविभागाच्या या अत्याधुनिक सुविधांमुळे पक्षाघातांच्या रुग्णांसाठी फायदा होतो.

गोल्डन अवरमध्ये फायद्यासाठी

डॉक्टर पांडुरंग वट्टमवार यांनी सांगितले की, पक्षाघाताच्या वेळी जितक्या कमी वेळेत रुग्ण दवाखान्यात पोहोचेल तितके त्याचे आयुष्य वाचवण्यासाठी फायदेशीर ठरते. तो गोल्डन अवर रुग्णाच्या आयुष्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो. या हेल्पलाइनच्या माध्यमातून एखाद्या रुग्णाला पक्षघाताचा झटका आला असेल, तर त्याला काय उपचार करायचे त्याला कुठे न्यायचे याबाबतची सर्व माहिती हेल्पलाइनच्या माध्यमातून देणार आहे. तसेच त्यांच्यासाठी रुग्णवाहिका सुविधा, जवळच्या कुठल्या दवाखान्यात जायचे, इतर जिल्ह्यातील रुग्ण असेल तर कुठल्या दवाखान्यात जायचे याच्यासंबंधीची माहिती या हेल्पलाइनच्या माध्यमातून मोफत दिली जाणार आहे.

मेंदूला रक्तपुरवठा होतो कमी

पक्षाघातामध्ये Save Minute Save Life प्रत्येक क्षण हा महत्वाचा असतो. ज्यामध्ये आपण कित्येक रुग्णांचे आयुष्य वाचवू शकतो. एखाद्या व्यक्तिला पक्षाघाताचा अॅटक आला तर मेंदूला रक्तपुरवठा कमी पडतो. मेंदूला रक्तपुरवठा कमी पडल्यानंतर प्रत्येक क्षणाला मेंदूच्या लाखो पेशी मृत होत असतात. अश्या वेळेस प्रत्येक क्षण खूप महत्वाचा असतो. त्यामुळे पक्षाघाताची लक्षणे आढळताच त्वरीत उपचार करणे, गरजेचे असते.

ब्रेन स्ट्रोकच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी 24 तास तत्पर हेल्पलाइन ACUTE STROKE HELPLINE NO-1800 5999100 क्रमांकाचे अनावरण बुधवारी केले आहे

वट्टमवार यांचा गौरव

डॉक्टर पांडुरंग वट्टमवार यांना वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन तर्फे डायमंड पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. पक्षाघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी नवनवीन पद्धती आणि शैलीचा अवलंब करणाऱ्या डॉक्टरांना संघटनेतर्फे हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार ओरियन सिटीकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व डॉ. पांडुरंग वट्टमवार यांना देण्यात आला. मराठवाड्यातील एकमेव उत्तम मेंदू रोगविभाग व मेंदूरोग तज्ज्ञ म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...