आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुकास्पद!:इन्फोसिस, बजाजसारख्या नामांकित कंपनीत श्री शाहू पॉलिटेक्निकच्या 24 विद्यार्थ्यांनी निवड

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकमधील 24 विद्यार्थ्यांची विविध नामांकीत अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. यामध्ये इलेट्रॉनिक्स अँण्ड टेलिकॉम विभागातील वरद संजय भडगावकर याची सिमेन्स टेक्नॉलॉजी अँण्ड सर्व्हिसेस प्रा.लि मध्ये निवड झाली आहे. तसेच इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागातील दिपक महादा पवार याची इन्फोसिस लि. या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे.

मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागातील उमेश सुदाम थोरे यांची सिमेन्स लि. तसेच मुकुंद धरपले, सुमित जाधव, आकाश काळे, ऋषिकेश पाटील, अक्षय पुंड, आवेझ शेख, प्राण टेहरे, शरद वाघ, शाम यादव, विवेक यादव, ऋषीकेश देशमुख, सुरज ढवळे, रोहित गोरे, कृष्णा जाधव, झैद मिर्झा, मुळे वैशाली, सौरभ शिंदे, अजय शेजवळ यांची बजाज ऑटो प्रा.लि.या कंपनीमध्ये त्याचप्रमाणे हरियाणा राज्यातील गुरगाव व पुणे स्थित हिरो इलेक्ट्रिक या कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागातील अविनाश थोरात, मयूर फलके, झुबेर पठाण, रोहन गायकवाड, सचिन घुले, विकास गोरे इ.विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

हिरोमध्ये विद्यार्थ्यांची निवड

या विद्यार्थ्यांना तीन लाखाहून अधिकचे पॅकेज मिळाले आहे. हिरो इलेक्ट्रिकमध्ये विद्यार्थ्यांची निवड होण्यासाठी इंपेरियल सोसायटी ऑफ इंनोव्हेटीव्ह इंजिनिअर्सच्या रुपाली अग्रवाल यांचे विशेष सहकार्य लाभले. अशी माहिती कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे यांनी दिली.

विद्यार्थी सर्व टप्प्यांवर यशस्वी

सदरील निवडीबाबत बोलताना त्यांनी या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्व विकास, सॉफ्टस्कील डेव्हलपमेंट, अभियोग्यता चाचणी अशा विविध स्वरूपाच्या चाचण्या घेण्यात आल्या असून हे विद्यार्थी सर्व टप्प्यांवर यशस्वी झाल्याचे सांगितले. आजपर्यंत 400 हून अधिक विद्यार्थी विविध नामांकित उद्योगांमध्ये नोकरी करत आहेत. यांची निवड कॉलेजमार्फत योग्य प्रशिक्षण व उच्च दर्जाचे प्रात्यक्षिक ज्ञान देऊन केली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे तसेच सर्व विभागप्रमुख यामध्ये ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सागर आव्हाळे, प्रा. संदीप मदन, प्रा. अनिकेत सोनवणे, प्रा. हरिष रिंगे, प्रा.सचिन काकडे, प्रा. चंद्रशेखर रहाणे, प्रा. माधव नरंगले, प्रा.विजय शेळके व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...