आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम:आठ महिन्यांत 2456 अनधिकृत नळ तोडले; 1125 झाले नियमित

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी महापालिकेने गतवर्षी उन्हाळ्यात मुख्य लाइनवरील बेकायदा नळ तोडण्याची मोहीम हाती घेतली होती. गेल्या आठ महिन्यांत २,४५६ बेकायदा नळ तोडण्यात आले. त्यात पथक क्रमांक एकने १,५५६ कारवाया केल्या आहेत. बेकायदा नळ तोडण्यासाठी मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांचे पथक नियुक्त करण्यात आले. या पथकाने बेगमपुरा भागातून कारवाईला सुरुवात केली होती. दरम्यान, या काळात महा अभय योजनेत ११२५ नळ नियमित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...