आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्य अभियंत्यांचा अंदाजपत्रक तयार:लेबर कॉलनीतील प्रशासकीय इमारतीसाठी 248 कोटींचा प्रस्ताव

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लेबर कॉलनी येथे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी २४८ कोटी ७४ लाख ५८ हजार रुपयांचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी अंदाजपत्रक तयार करून महसूलच्या अपर मुख्य सचिवांना प्रस्ताव पाठवला आहे. पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्र पाठवून निधी देण्याची मागणी केली आहे. लेबर कॉलनीतील निवासस्थाने पाडल्यानंतर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व सरकारी कार्यालयांसाठी प्रशासकीय इमारती उभारल्या जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...