आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉशिंग सेंटर:5 लाख दुचाकींच्या स्वच्छतेतून 2.5 कोटींची कमाई ; चालकांनी आकारले प्रति दुचाकी 50 रुपये शुल्क

औरंगाबाद / संतोष देशमुख2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दसऱ्याला संपूर्ण बाजारपेठेत विविध व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. नवीन वाहन खरेदी, २४ कॅरेट सोने, चांदी, कपडे खरेदीसाेबतच वॉशिंग सेंटर चालकांनीही लाखाेंचा व्यवसाय केला. शहर, जिल्ह्यातील मिळून सुमारे दोन हजार वॉशिंग सेंटरचालकांनी बुधवारी एकाच दिवशी पाच लाख दुचाकीच्या स्वच्छतेतून सुमारे अडीच कोटी रुपये कमावले. प्रति दुचाकी ५० रुपये शुल्क आकारल्याचे सेंटरचालकांनी सांगितले.

वाहन गरजेची वस्तू झाल्याने घरोघरी एक ते दोन दुचाकी आहेत. औरंगाबाद प्रादेशिक परिवहन विभागात दहा लाखांवर दुचाकी आहेत. दसऱ्यानिमित्त प्रत्येक जण दुचाकीची स्वच्छता करून पूजा करताे. त्यापैकी अडीच लाख दुचाकी घरच्या घरी व अडीच लाख दुचाकी स्वच्छ केल्या नाहीत असे गृहीत धरले तरी उर्वरित निम्म्या म्हणजेच पाच लाख दुचाकी चालकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन हजार वॉशिंग सेंटरवर आपल्या दुचाकींची स्वच्छता केली. प्रति वॉशिंग सेंटरवर सरासरी २५० दुचाकींची स्वच्छता करण्यात आली. एक दुचाकीला ५० रुपयेप्रमाणे शुल्क आकारले. यातून वॉशिंग सेंटरचालकांनी एकाच दिवशी पाच लाख दुचाकी मालकांकडून एकूण अडीच कोटी रुपयांची लूट केल्याचे दिव्य मराठी प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून समोर आले. एरव्ही दुचाकीच्या वाॅशिंगसाठी ३० ते ४० रुपये आकारले जातात.

अडीच कोटी लिटर पाण्याचा झाला वापर
दसऱ्यानिमित्त सकाळपासूनच दुचाकी वाॅशिंगसाठी येण्याचे प्रमाण प्रचंड वाढले होते. एका वॉशिंग सेंटरला कमीत कमी २०० तर ज्यांच्याकडे दोन वॉशरची व्यवस्था होती त्यांच्याकडे जास्तीत जास्त साडेचारशेवर दुचाकी स्वच्छतेसाठी आल्या होत्या. एका दुचाकीसाठी पाच लिटर पाणी जरी म्हटले तरी पाच लाख दुचाकींसाठी अडीच कोटी लिटर पाण्याचा सेंटरचालकांनी वापर केला. हे पाणी रस्ते, नाल्यातून वाहत होते.

बातम्या आणखी आहेत...