आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या वर्षी एक लाख भाविक:ग्रहणाच्या संभ्रमामुळे पारदेश्वर मंदिरात यंदा 25 हजार भाविक

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारदेश्वर मंदिरातील कार्तिकस्वामींचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी एक लाख भाविक हजेरी लावतात. पण, यंदा ग्रहण आणि नक्षत्रांच्या योगामुळे दर्शनाबाबत संभ्रम झाल्याने रात्री उशिरापर्यंत फक्त २५ हजार भाविकांनी हजेरी लावली. पारदेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने दीड क्विंटलचा भात, एक क्विंटल बुंदीचा प्रसाद तयार केला होता.

सायंकाळी ४ वाजेनंतर त्रिपुरारी पौर्णिमेला प्रारंभ झाल्याने भाविकांनी गर्दी केली. मात्र, कार्तिकीस्वामींचे मंदिर सकाळपासून भक्तांसाठी खुले केले होते. महिलांना कार्तिकस्वामींचे दर्शन फक्त त्रिपुरारी पौर्णिमेलाच घेता येत असल्याने त्यांची गर्दी लक्षणीय असते, असे मंदिराचे विश्वस्त आनंदगिरी महाराज यांनी सांगितले. महिलांनी एकच दिवस दर्शन घेण्याची परंपरा फक्त महाराष्ट्रातच आहे. इतर राज्यांत कायम कार्तिकस्वामींचे दर्शन घेता येते. यंदा ७ नोव्हेंबरला भरणी नक्षत्रावर त्रिपुरारी पौर्णिमा आल्याने महिलांना कार्तिकस्वामींचे दर्शन घेता येणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला. दरम्यान, ज्योतिषाचार्य अनंत पांडव यांनी सांगितले की, शास्त्रानुसार ज्या पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्र असेल त्या दिवशी कार्तिकीस्वामींचे दर्शन महिलांना घेणे योग्य आहे. तर आनंदगिरी महाराज म्हणाले, कृत्तिका नक्षत्र नसले तरी त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने पुरुषांसह महिलांना स्वामींचे दर्शन घेता येणारआहे. मात्र, ८ नोव्हेंबरला ग्रहण असल्याने दिवसभर मंदिर बंद राहणार आहे.

तेली समाजाचे सुरुवातीपासूून योगदान मंदिर उभारणीपासूनच शहरातील तेली समाजाने योगदान दिले आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेचा मसालेभात आणि बुंदीचा प्रसाद समाजाच्या वतीने वाटप केला जाताे. यासाठी श्यामलाल टेटवार, सुनील कसबेकर, कचरू वेळंजकर आदी परिश्रम घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...