आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘दिगबरा दिगंबरा..श्रीपाद वल्लभ दिंगबरा..’ नामाचा जयघोष करत भाविकांनी हडको एन-९ श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात बुधवारी महिला भाविकांच्या उपस्थितीत दत्तजयंती जन्मोत्सव साजरा केला. या वेळी पाच हजार भाविकांची उपस्थिती होती. दिवसभरात २५ हजार भाविकांनी दर्शन घेतले.
श्री दत्तात्रेय जयंतीनिमित्त शहरातील विविध दत्त मंदिरात आरती, महाप्रसादाचे आयोजन केले होते. सकाळी ८ वाजता सणवार, वैकल्य शिबिरात वर्षभरात येणारे सण कशा पध्दतीने साजरे करावे, त्यामागचे वैज्ञानिक कारण यावर मार्गदर्शन केले. स्वामींना उपवासाचा नैवेद्य, महिलांनी मागितला जोगवा : दत्तजयंतीनिमित्त उपवास असल्याने श्री स्वामी समर्थांनासुध्दा उपवासाचा नैवेद्य दाखविण्यात आला. यात ड्रायफ्रूट, शिंगाड्याचे पीठ, भगर, केळी आदी तयार केले होते. आरतीनंतर महिलांनी पदर पसरवत जोगवा मागितला. ८ रोजी मंदिरात प्रत्येक महिला भाविक २० ते २५ पोळ्या, बटाट्याची कोरडी भाजी घेऊन येणार असून या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
दत्तजयंतीनिमित्त ५ टन धान्य : श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गहू, तांदूळ, तेल अशा विविध प्रकारचे किराणा सामान भाविकांनी दिले. यात ५ टन धान्य संकलित झाले असून विविध ठिकाणी अन्नदान करण्यासाठी पाठवण्यात येते.
सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या मंदिरात राजेंद्र वाळके यांनी अन्नदान केल्यामुळे कित्येक पिढ्यांचा उद्धार होत असतो म्हणून नियमित अन्नदान करीत राहावे... अशा वाक्यांची रांगोळी रेखाटली. ज्योती उईके यांची पोर्ट्रेट रांगोळी लक्षवेधक ठरली.
दुपारी १२.३९ वाजता जन्मोत्सव साजरा स्वामी समर्थ सेवा केंद्रात दुपारी १२.३० वाजता सेवेकरी मनोज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुचरित्राच्या चौथ्या अध्यायाचे पठण करण्यात आले. यानंतर रमेश इधाटे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
एन-७ दत्तमंदिरात फुलांचा पाळणा सिडको एन-७ भागातील दत्त मंदिरात सुधीर नाईक यांच्याहस्ते आरती झाली. याप्रसंगी सदाशिव पाटील, प्रज्ञा रामदासी यांची उपस्थिती होती. दत्तांच्या जन्मोत्सवानिमित्त फुलांनी सजवलेला पाळणा केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.