आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उद्योजकता व कौशल्य विकास केंद्राने यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून तीन नवे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यासाठी ५ ऑगस्टपर्यंत इच्छुकांना अर्ज करता येतील. कोर्सचे शुल्क दहा हजार रुपये आहे. सर्टिफिकेट कोर्स इन मॅनेजरियल स्किल डेव्हलपमेंट अँड आंत्रप्रेन्यूरशिप, सर्टिफिकेट कोर्स इन टेक्नॉलॉजी फॉर इंडस्ट्रियल प्रोसेस आणि सर्टिफिकेट कोर्स इन मेकॅट्रॉनिक्स अँड इंडस्ट्री ४.० या तिन्ही कोर्सची प्रवेश क्षमता ९० आहे. हे काेर्स सहा महिन्यांचे असून दरमहा २५ हजार रूपयांपर्यंत वेतनाची नोकरी मिळू शकेल.
औरंगाबाद इलेक्ट्रिकल लिमिटेडने (एईएल) एज्युकेशनल सोशल रिस्पॉन्सिबिल्टी अंतर्गत विद्यापीठाला दीड कोटीचा निधी मंजूर केला आहे. या फंडातून विद्यापीठाने उद्योजकता व कौशल्य विकास केंद्राची स्थापना केली आहे. सर्व कोर्सेस सहा महिन्यांचे आहेत. कोणत्याही शाखेचा पदवीधर प्रवेशास पात्र आहे. हा कोर्स विना अनुदानित असला तरीही आरक्षण लागू आहे. अधिक माहितीसाठी bamu.ac.in वर भेट द्यावी.
उद्योजकच करतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित : एईएलचे उपाध्यक्ष डॉ. सोमेन मुजुमदार, एंड्युरन्सचे डॉ. राजेश जावळेकर, एक्स्पर्ट ग्लोबल सोल्युशनचे मुकुंद कुलकर्णी, प्रशांत देशपांडे, एंड्युरन्सचे राम मार्लापल्ले, गरवारेचे व्ही. व्ही. राखुंडे, उद्योजक दिलीप धारूरकर, ऋचा इंजिनिअरिंगचे उमेश दाशरथी, सिग्माचे डॉ. उन्मेष टाकळकर हे विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणार आहेत.
तीन महिने थिअरी, ३ महिने कंपन्यांमध्ये प्रॅक्टिकल
या अभ्यासक्रमात ३ महिने थिअरी आणि ३ महिने संबंधित १० कंपन्यांत प्रॅक्टिकल करावे लागेल. उद्योजकतेचे कौशल्य यातून देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी दहा कंपन्यांशी आम्ही सामंजस्य करार केला आहे. याच कंपन्यांतून विद्यार्थी आधी इंटर्नशिप करतील. त्यानंतर कंपन्या त्या-त्या इंटर्नचा प्रामाणिकपणा आणि योग्यता पाहून दरमहा २५ हजार रुपये वेतन देतील असाच कोर्स आम्ही डिझाइन केला. -डॉ. वाल्मीक सरवदे, समन्वयक, उद्योजकता व कौशल्य विकास केंद्र
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.