आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुरुनानक देवजींच्या ५५३ व्या जयंतीनिमित्त पहिल्यांदाच शीख समाजाच्या पाच गुरूंच्या सहा शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होतेे. उस्मानपुरा येथील गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभा येथे सोमवारी रात्री ११ वाजता शस्त्रांचे दर्शन घेतले. या शस्त्रांना बुटासिंग यांनी १३ पिढ्यांपासून (२६० वर्षे) जतन केले आहे. उस्मानपुरा गुरुद्वारा येथून मंगळवारी सायंकाळी नगरकीर्तन मिरवणुकीत पंचप्याऱ्यांचेही दर्शन शहरवासीयांना घडले.
भाई बुटासिंग यांनी ही शस्त्रे औरंगाबादेत आणली होती. शीख धर्माचे सहावे गुरु हरगोविंदसिंग साहेब, गुरु हरराय साहेब, गुरु हरकिशन साहेब, गुरु तेगबहादूर साहेब आणि शेवटचे गुरुगोविंदसिंह साहेब यांची सेवा बुटासिंग यांच्या परिवाराने केली होती. बुटासिंहजी म्हणाले, गुरू हरगोविंदसिंहजी आमच्या गावात सहा महिने भाई रुपालसिंगजी यांनी सेवा केली. त्यामुळे संतुष्ट होऊन गुरु हरगोविंदसिंह यांनी शस्त्र रुपालसिंगजींना बक्षीसरूपात दिली होती. रुपालसिंगजी यांचे आम्ही १३ वे वंशज आहोत. अमेरिकेतील तज्ज्ञ या शस्त्रांची देखभाल करतात.
शीख समाजाचा दिला परिचय
शहरातील ग्लोबल शाळेच्या ४०० विद्यार्थ्यांनी सिंधी कॉलनी गुरुद्वाऱ्यात भेट दिली. या वेळी त्यांनी गुरुद्वारा पाहिला. समाजातील दहा गुरूंची सविस्तर माहिती जाणून घेतली. गुरुवाणी काय आहे, प्रथा-परंपरा काय आहे हे समजावून घेतले. विविध जाती-धर्मांना समाजाचा परिचय देणारा हा उपक्रम झाला. या वेळी मुलांना लंगर प्रसादी देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.