आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:राज्यभरात 2507 शाळा एक खोलीच्या, 45% शाळांत हात धुण्यासाठी पाणी नाही; फिजिकल डिस्टन्सिंग, कोरोनाविरुद्धचे नियम पाळणे अशक्य

औरंगाबाद2 वर्षांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • 5.72% प्राथमिक शाळा 1 शिक्षकी, 317 शाळांना वर्ग खोल्याही नाहीत

राज्य सरकार फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमात राहून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा विचारात आहे. मात्र, राज्यातील ३१७ शाळांना वर्ग खोल्याच नाहीत. २५०७ शाळा एका खोलीतच भरतात. ५.७२% प्राथमिक, १८.९७% उच्च प्राथमिक शाळा एक शिक्षकी आहेत. ४५% शाळांत नळही नाही. यामुळे दर दोन तासाला हात धुण्याची सोय नसल्याचे शिक्षण खात्याच्या संकेतस्थळावरील माहितीवरून दिसते. राज्यात शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी आहेत. कागदोपत्री शाळा सुरू करणे सुलभ वाटत असले तरी त्याची अंमलबजावणी कोरोनाला निमंत्रण देणारी ठरू शकते, असे पाहणीतून समोर आले.

एक शिक्षकी शाळांचाही प्रश्न

एक शिक्षकी शाळांचा प्रश्नही शाळा सुरू करण्यात अडथळा निर्माण करू शकतो. राज्यात ५.७२ % प्राथमिक तर १८.९७ % उच्च प्राथमिक शाळा एक शिक्षकी आहेत. या शाळांमध्ये दोन वर्ग एकत्र भरवले जातात. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग राखणे शक्य होणार नाही.

शाळांमधील पाण्याची सोयही अपुरी

कोरोनाच्या काळात दर २ तासांनी हात धुण्याचे सांगितले जाते. स्वच्छ विद्यालय अभियानात राज्यात ९०% वर शाळांत स्वच्छतागृहे आहेत. यातील ५२% शाळांतच व्यवस्था आहे. राज्यात ११३५२६ पैकी ६३०२० शाळांत नळाची सोय आहे. २२५२८ शाळांत हातपंप, ८९१४ शाळात विहिरी आहेत. ४५% शाळांमध्ये नळ नाहीत.

अनुदानित शाळांत क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थी

आरटीई कायद्याप्रमाणे पहिली ते पाचवीसाठी ३० विद्यार्थी, तर ६ वी ते ८ वीसाठी ३५ विद्यार्थी क्षमतेचे वर्ग बांधले जातात. राज्यात एकूण विद्यार्थी संख्या २,१७,४१५१९ आहे. मात्र, शाळांत क्षमतेपेक्षा दुप्पट म्हणजे एका वर्गात ७० च्या पुढे विद्यार्थी असतात.

1234 मुलांच्या शाळा

2133 मुलींच्या शाळा

11,0159 एकत्रित शाळा

1,13,526 एकूण शाळा

सध्या शाळा सुरू करणे चुकीचे

घाई-गडबडीत प्रशासनाने निर्णय घेतला. प्रत्यक्षात शाळा सुरू करण्यात अनंत अडचणी आहेत. मुख्यमंत्र्यांनी फिजिकल डिस्टंन्सिंगच्या वर्गाचे प्रात्यक्षिक बघितले होते, हे खरे. परंतु,त्यात दुरुस्तीची गरज आहे. या विषयी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. शिक्षण क्षेत्रातील विषमता आर्थिक विषमतेपेक्षा मोठी आहे. शिक्षणात समान संधी हव्यात. काही ठिकाणी ऑनलाइन तर काही ठिकाणी प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले आणि इतर ठिकाणी काहीच नसेल तर एकसूत्रीपणा कसा राहील? बच्चू कडू, शालेय शिक्षण राज्यमंत्री

बातम्या आणखी आहेत...