आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओपन बुक टेस्ट:बारावी बोर्डाच्या 25,221  विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच दिली ओपन बुक टेस्ट

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी नियमित महाविद्यालयात यावे यासाठी शिक्षण विभागातर्फे औरंगाबाद जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात येणारी पहिली साप्ताहिक परीक्षा (ओपन बुक टेस्ट) गुरुवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी इलेक्ट्रॉनिक्स, बायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स विषयाचे पेपर घेण्यात आले. औरंगाबाद शहरातील १५,१३५ तर जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १०,०८६ अशा एकूण २५,२२१ विद्यार्थ्यांनी पुस्तकात पाहून तसेच शिक्षकांची मदत घेत हे पेपर सोडवले.

औरंगाबादसह जिल्ह्यातील फुलंब्री, सिल्लोड, साेयगाव, खुलताबाद, वैजापूर या पाच तालुक्यांत गुरुवारी परीक्षा झाली. उर्वरित म्हणजेच गंगापूर, पैठण, कन्नड तसेच औरंगाबाद ग्रामीण भागांतील महाविद्यालयात ही परीक्षा २ डिसेंबरनंतर होईल. विद्यार्थ्यांचा गेल्या दोन वर्षांत लेखनाचा सराव कमी झाला आहे.

तसेच सलग बसणे आणि तीन तास लिहिणेही त्यांच्यासाठी कठीण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे औरंगाबाद माध्यमिक शिक्षण विभागातर्फे यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांचा सराव होण्यासाठी आणि बोर्ड परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी साप्ताहिक परीक्षा ओपन बुक टेस्ट स्वरूपात घेण्यात येत आहे. पहिली परीक्षा विद्यार्थी शिक्षकांच्या सहाय्याने देतील. मात्र, दुसऱ्या साप्ताहिक परीक्षेसाठी शिक्षक मदत करणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...