आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणुक:26 हजार परस्पर लाटले, फायनान्स कर्मचाऱ्यावर गुन्हा

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्राहकाकडील हप्त्याच्या अवघ्या २६ हजारांसाठी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीचा कर्मचारी फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी झाला. कंपनीने वारंवार विचारणा करूनही त्याने प्रतिसाद न दिल्याने कंपनीने तक्रार केली. त्यावरून युवराज गोविंदा पवार (रा. नवनाथनगर, गारखेडा) विरोधात उस्मानपुरा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दीड वर्षापासून युवराज श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीत रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. त्याच्याकडे वसुलीचे काम होते. तीन महिन्यांपूर्वी कंपनीचे ग्राहक दीपक देवरे यांनी युवराजकडे २९ हजार रुपये दिले होते. ते कंपनीच्या खात्यात जमा करणे अपेक्षित होते. परंतु, त्याने २ हजार ९०० रुपये जमा केले. ऑटोमेटिक मेसेजमध्ये एडिट करून २९ हजार जमा केल्याचा ग्राहकाला मेसेज पाठवला. हा प्रकार कंपनीला समजला. त्यानंतर कंपनीने त्याला वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, तो भेटला नाही. त्याने पोबारा करण्यापूर्वी कंपनीचा लॅपटॉप, प्रिंटर व डोंगल घेऊन गेल्याचे व्यवस्थापक स्वप्निल माळवे यांनी तक्रारीत म्हटले. सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...