आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून मुस्लिम भाविकांना हज यात्रेसाठी जाता आले नव्हते. परंतु आता सौदी अरेबियाने परवानगी दिल्याने यावर्षी भारतातून भाविक हज यात्रेसाठी जाणार आहे. त्यासाठी शहरातील जामा मशीद येथील सईद हॉलमध्ये हज यात्रेपूर्वी शुक्रवार 10 जून रोजी 260 भाविकांची लसीकरण करण्यात आले. तर उर्वरित भाविकांची शनिवारी लसीकरण करण्यात येणार आहे.
मुस्लिम समाजात हज यात्रेला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे देशभरातून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी हज कमिटीतर्फे नंबर लावतात. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव व कडक निबंध मुळे हज यात्रा बंद होती. यावर्षी सौदी अरेबिया शासनाने परवानगी दिल्याने भाविकांनी हज यात्रेसाठी नंबर लावले होते. औरंगाबाद विभागातून जवळपास 400 पेक्षा जास्त भाविक हज यात्रेसाठी जाणार आहेत. हज यात्रेच्या पूर्वतयारी निमित्त हज कमिटीच्या वतीने भाविकांना इन्फ्लुएन्झा सहा 60 वयोगट यापेक्षा जास्त व्यक्तींना लसीकरण करण्यात येते. ती लसीकरण मोहीम शहरातील जामा मशीद येथील सईद हॉलमध्ये राबवण्यात आली. यात शुक्रवार 10 जून रोजी 260 भाविकांना लस देण्यात आली. उर्वरित भाविकांना शनिवार 11 जून रोजी लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती खिदमत ये हुज्जाज कमिटीचे अध्यक्ष मिर्झा रफद बेग यांनी दिली. या लसीकरण प्रसंगी मौलाना नसीमुद्दीन मिक्ताई, शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर सय्यद मुदस्सीर, डॉ मुजफ्फर मणियार यांच्यासह शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते
साडेचार हजार जण जाणार
महाराष्ट्रातून यावर्षी हज कमिटीतर्फे साडेचार हजार पेक्षा जास्त भाविक हज यात्रेसाठी जाणार आहेत. त्यापैकी औरंगाबाद विभागातून साडेचारशे पेक्षा जास्त भाविकांचे नंबर हज कमिटीतर्फे लागलेले आहे. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून आता लसीकरण व त्यानंतर त्यांना बॅग वितरित करण्यात येणार आहे.
18 जून रोजी विमान
18 जून रोजी हाज यात्रेसाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांना सौदी एअरलाइन्स विमानाच्या माध्यमातून जद्दा कडे रवाना होणार आहे या विमानात 400 प्रवासी राहणार आहे.तर शेवटचा विमान 3 जुलै रोजी रोजी यात्रेकरूंना घेऊन जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.