आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेने मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत सोमवारी हर्सूल मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडील थकीत २७.४९ लाखांची पाणीपट्टी वसूल केली.पालिकेच्या उपायुक्त तथा कर निर्धारक व संकलक अधिकारी अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीची मोहीम राबवली जात आहे. त्यानुसार सहायक आयुक्त राहुल सूर्यवंशी, अधीक्षक शैलेश इवरकर यांच्या पथकाने हर्सूल मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडील २७ लाख ४९ हजार ६६६ रुपयांची थकीत पाणीपट्टी वसूल केली. प्रशासनाने धनादेशाद्वारे पाणीपट्टीची रक्कम अदा केली. प्रभाग-८ चे सहायक आयुक्त संतोष टेंगळे यांच्या पथकाने वॉर्ड क्रमांक १०६ कांचनवाडी येथील नाथ व्हॅली स्कूलकडील १६,८२,५८० रुपये मालमत्ता कर व ५,५३,५५० रुपयांची थकीत पाणीपट्टी वसूल केली.
व्यावसायिक मालमत्ता सील प्रभाग सातचे कार्यालयीन अधीक्षक कैलास जाधव यांच्या उपस्थितीत वॉर्ड क्रमांक ९८ उल्कानगरी येथील हायस्ट्रीट मार्केटमधील कर थकवणारी पाच दुकाने सील केली. या दुकानदारांकडे १,१८,८६८ रुपयांचा मालमत्ता कर थकलेला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.