आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचोपडा शासकीय परीक्षा मंडळ पुणे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये पाचवीच्या परीक्षेत पंकज प्राथमिक विद्यालयाचे सात, व माध्यमिक विद्यालयाचे २ अशा ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर इयत्ता आठवी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत १८ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. एकूण २७ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. माध्यमिक विद्यालयाची मनस्वी दीपक पाटील या विद्यार्थिनीने शहरी भागातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिला गणित विषयात १०० पैकी ९८ गुण मिळाले.
इयत्ता पाचवीतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांमध्ये संचित दिवाकर बडगुजर -२३६, सुधीक्षण सतीश पाटील - २२६, मोहीत मनोहर माळी-२१२, तेजस सुनील सोनवणे-१९०, गार्गी दिलीप पाटील-१८८, लोकेश रविंद्र पाटील-१८०, राजवर्धन गणेश भोईटे-१७२, रुचिका समाधान पाटील १७६, ओम प्रवीण पाटील-१६४, इयत्ता आठवीतील मनस्वी दीपक पाटील-२४४ जिल्ह्यात प्रथम, खुशी चंद्रशेखर सोनवणे-२२६, रिया दिलीप जैस्वाल- २१८, सृष्टी चंदन पवार-२०४, सुर्यकांता संदीप पाटील-१९०, हिमजा जितेंद्र पाटील-१९०, वैभव योगेश पेंढारे-१८०, जयेश सचिन पाटील-१७६, जिज्ञेश ज्ञानेश्वर सोनगिरे-१७२, मोहीत भरत पाटील-१६८, भैरवी अतुल चव्हाण-१६८, प्रेक्षा प्रशांत पाटील-१६८, खुशी वसंत पाटील-१६६, श्यामल प्रवीण पाटील-१६२, सिद्धी महेश सनेर-१६२, अवनी अरविंद पाटील-१६०, देवेश जगदीश सोनवणे १५४, यशराज शरद शिरसाठ-१५२ या २७ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. संस्थाध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले, नारायण बोरोले, गोकुळ भोळे यांनी कौतुक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.