आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी पंप:दीड महिन्यात 27 हजार 980 वीज जोडण्या ; ‘पेड पेंडिंग’ प्रश्न सोडवण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणने शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दीड महिन्यात २७,९८० नवीन कनेक्शन दिले आहेत. शेतकऱ्यांच्या ‘पेड पेंडिंग’चा प्रश्न सोडवण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कनेक्शन मिळण्यासाठी काही वेळ थांबावे लागते. त्याला पेड पेंडिंगचा प्रश्न म्हणतात. महावितरणने ३१ मार्च २०२२ अखेर कृषी पंपांसाठी वीज कनेक्शन मिळण्यासाठी प्रलंबित १,८०,१०६ अर्जांपैकी ८२,५८४ कनेक्शन एप्रिल २०२२ ते १५ डिसेंबर २०२२ या कालावधीत दिले. महावितरण ३१ मार्च २०२३ पर्यंत आणखी १ लाख कृषी पंपांना जोडण्या देण्यास प्रयत्नशील आहे.

बातम्या आणखी आहेत...