आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदिरांचे संवर्धन:पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीसह 28 मंदिरांचा होणार कायापालट, 8 जणांची टीम एकादशीनंतर पंढरपूरला रवाना होईल

औरंगाबाद10 महिन्यांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • ... या मंदिरांचे होणार संवर्धन

भाविकांची गर्दी, स्पर्श, तापमान, आर्द्रता, गळती, दिवाबत्ती, वारा यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासह परिसरातील मंदिरांवर अनेक दुष्परिणाम होत आहेत. त्यावर उपाय सुचवण्यासाठी राज्य पुरातत्त्व खात्याच्या पॅनलवरील आर्किटेक्टचे पथक या मंदिरांचा अभ्यास करणार आहे. थर्माेग्राफीद्वारे हे तज्ञ मूर्ती, भिंतीतील गळती, भेगा आणि अन्य धोके शोधतील. विशेष म्हणजे मुख्य मंदिरासह देवस्थान समितीच्या ताब्यातील २८ मंदिरांना पूर्वीचे रूप देण्यासाठी हे पथक काम करेल.

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मूर्तींवर पुरातत्त्व खात्याच्या विज्ञान शाखेच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच सिलिकॉन कोटिंग झाली. हेे पथक परतताच राज्य पुरातत्त्व खात्याच्या पॅनलवरील औरंगाबादचे आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ जणांची टीम एकादशीनंतर पंढरपूरला रवाना होईल.

... या मंदिरांचे संवर्धन

पंढरपुरातील एकवीरा देवी मंदिर, खंडोबा, सोमेश्वर, रिद्धी-सिद्धी गणपती मंदिर, लक्ष्मण पाटील यांचे देऊळ, विष्णुपाद, नारद, दगडावरील विष्णुपाद, लखुबाई मंदिर, दिंडीर वनातील रुक्मिणी, अंबाबाई, व्यासनारायण, पद्मावती देवी, यमाई-तुकाई, त्र्यंबकेश्वर मंदिर, समाधी मंदिर, काळभैरव नवगृह महाद्वार, शाकंभरी देवी, नरसोबा कुंडलतीर्थ, मारुतीचा पार, काळा मारुती, सटवाई, येलम्माई, गणपती आणि नरसोबा, मारुती, तांबडा मारुती आदी.

बातम्या आणखी आहेत...