आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालय:राष्ट्रीय लोकअदालतीसमोर जिल्ह्यातील 28350 प्रकरणांवर आज होणार सुनावणी

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणातर्फे १२ नोव्हेंबर उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुकास्तरीय न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे २८३५० प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लोकअदालतीत उभय पक्षकारांच्या सहभागाने व संमतीने निकाल लागतो. तो अंतिम व दोन्ही पक्षकारांवर बंधनकारक असतो. निकालाची अंमलबजावणी कायद्याप्रमाणे करता येते. अदालतीमध्ये एखादे प्रकरण संपुष्टात आल्यास नियमानुसार कोर्ट फीमध्येगी सूट मिळते.

अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रकरणांचा तपशील असा. औरंगाबाद खंडपीठ - ६००, जिल्हा व सत्र न्यायालय, औरंगाबाद व त्या अंतर्गत सर्व तालुकास्तरीय न्यायालये मिळून - १६५७. तडजोडपात्र फौजदारी खटले - १२,८१५. चेक बाउन्स - २९३९. कर्जवसुली - १५६७. वीज बिल, पाणीपट्टी - १९२१. वैवाहिक वाद - ३४३६. ग्राहक मंच - ५८, कौटुंबिक वाद - ५८. औद्योगिक - ५०. याशिवाय विविध वित्तीय संस्थांचीही प्रकरणे आहेत. सोशल प्लॅटफाॅर्मचा वापर करूनही अदालतीत सहभागी होता येईल. इच्छुकांनी ०२४०-२३६३७७८ वर िकंवा आपल्या वकिलांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणीस यांनी केले आहे.

नियम मोडल्याबद्दल दंडाची रक्कमही भरता येणार
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अनेकांना मोबाइलवर ई-चलान येते. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये अशी वाहतूक ई - चलनाची प्रकरणेही ठेवण्यात आली आहेत. त्या दिवशी किंवा त्याआधी दंडाची रक्कम संबंधितास भरता येईल. त्यानंतर ई- चलान रद्द होईल.

बातम्या आणखी आहेत...