आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिवडणूक आयोगाच्या वतीने मतदार कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची माेहीम १ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली. ती १ एप्रिल २०२३ पर्यंत चालणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २९ लाख मतदार आहेत. बीएलओ प्रत्येकाच्या घरी जाऊन सहा ब फॉर्म भरून घेणार आहेत. तसेच व्होटर हेल्पलाइन अॅपवरून ही प्रक्रिया करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी म्हणाले, १ ऑगस्टपासून ९ विधानसभा मतदारसंघांत २८०० बीएलओ मतदारांच्या घरी जाऊन आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया करतील. दाेन ठिकाणी असलेली मतदार यादीतील नावे वगळली जातील. मतदान केंद्र स्तरावर सप्टेंबरमध्ये दोन विशेष शिबिरांचे आयोजन केले जाईल. तसेच वर्षातून चार वेळा मतदार यादीत नाव नोंदवता येईल.
मतदारालाही करता येणार आधार संलग्नीकरण
वोटर हेल्पलाइन ॲपव्दारे आधार क्रमांक मतदार यादीला लिंक करता येईल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरमधून वोटर हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी करावी. नंतर मतदार ओळखपत्र क्रमांक टाकावा. त्यानंतर मतदार यादीतील सर्व माहिती दिसेल. त्यावर आधार क्रमांक नोंदवल्यास ओटीपी प्राप्त होईल. ती सबमिट केल्यानंतर आधार लिंक यशस्वी होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.