आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेप दाखल:मनपा प्रभाग आराखड्याच्याविरोधात 29 आक्षेप दाखल ; 24 जून रोजी यावर होणार सुनावणी

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाच्या ४२ प्रभागांचा प्रारूप आराखडा २ जून रोजी प्रसिद्ध झाला. त्यावर आक्षेप, सूचना असल्यास कळवण्याचे आवाहन मनपाने केले होते. त्यानुसार १४ जूनपर्यंत २९ जणांनी आक्षेप नोंदवले आहेत. १६ जूनपर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत आहे. १७ जून रोजी प्राप्त सूचना, हरकती निवडणूक आयोगाकडे पाठवल्या जातील. २४ जून रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर आयोगाकडे शिफारशी केल्या जातील. अनेक प्रस्थापित नेत्यांच्या वॉर्डांचे विविध प्रभागांत विभाजन झाल्याने ते अडचणीत आले आहेत. भाजपने यापूर्वी आराखड्यावर आक्षेप नोंदवला आहे. तर आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप करत संपूर्ण आराखडाच रद्द करण्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...