आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संख्येत दुपटीने वाढ:वाळूज परिसरातून दाेन वर्षांत 298 महिला बेपत्ता ; 25 ते 35 वयोगटातील सर्वाधिक महिला

औरंगाबाद/ संतोेष उगलेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज औद्योगिक परिसरातून महिला-मुली बेपत्ता होण्याची संख्या पुन्हा वाढली अाहे. मागील दोन वर्षांत तब्बल २९८ महिला बेपत्ता झाल्या. यात २५ ते ३५ वयोगटातील विवाहित महिलांची संख्या सर्वाधिक अाहे. यापैकी ८२ महिलांचा अद्याप शोध लागला नाही. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यातील आकडेवारीनुसार जानेवारी २०१५ ते सप्टेंबर २०२२ या आठ वर्षांत ७९७ महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे. समाजात बदनामी होऊ नये म्हणून बेपत्ता झाल्याची नोंद न करणाऱ्यांची आकडेवारी यापेक्षाही दुप्पट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिला-मुली बेपत्ता होण्याची कारणे जरी व्यक्तिपरत्वे भिन्न असली तरी बहुतांश महिला-मुलींच्या घराबाहेर पडण्याच्या पद्धती, घर सोडल्यानंतर व घरी परत येण्यासाठी येणाऱ्या अडचणी आदींमध्ये अनेक बाबी समान आढळून अाल्या अाहेत. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने परत आलेल्या बेपत्ता महिला, त्यांच्या पालकांशी संपर्क साधत बेपत्ता होण्यामागची कारणे, स्वत:सह परिवारातील सदस्यांच्या आयुष्यावर होणारा परिणाम याबाबत जाणून घेतले.

अाजारी पती, दाेन मुलांना साेडून प्रियकरासाेबत गेली पळून : एक तरुण कामगार कामानिमित्त वाळूजला अाला. काही दिवसांत त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदर्शनास आले. याचदरम्यान कंपनीत कामावर जाणाऱ्या त्याच्या पत्नीचे प्रेमसंबंध सहकारी कामगारासोबत जुळले. पती रुग्णालयात गेल्याची संधी साधून ती बेपत्ता झाली. पुढे आपण प्रियकरासोबतच राहणार असल्याचे तिने फोनवर पतीला सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे १२ व ८ वर्षांच्या दोन मुलांना घरीच सोडून पसार झालेल्या आईचे काळीज पाझरत नाही. दोन्ही मुलांना व पतीला सोडून ती कायमची निघून जाते. ‘त्या’ प्रियकरानेसुद्धा पत्नीला सोडून दिल्यानंतर हिच्याशी सूत जुळवले होते त्यामुळे तो हिची कितपत साथ देणार? महिलेचे पुढे काय होणार? हे येणारा काळच ठरवेल.

महिलांमध्ये जनजागृतीची गरज महिला बेपत्ता होण्याची कारणे वेगवेगळी असतात. त्यामध्ये लग्नापूर्वी रंगवलेल्या स्वप्नांपेक्षा प्रत्यक्षात असणारे वास्तव न स्वीकारणे, भौतिक सुखाची प्रचंड इच्छा, पैशांच्या मागे लागलेल्या कामगारांना घरी पुरेसा वेळ न देता येणे ही प्रमुख कारणे आहेत. असे प्रकार हाेऊ नयेत म्हणून महिलांमध्ये जनजागृतीची गरज आहे. - सुनीता तगारे, सामाजिक कार्यकर्त्या

बातम्या आणखी आहेत...