आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरोघरी श्रीगणेश:देशातील गणेशमूर्तींच्या निर्मितीचे माहेरघर असलेल्या पेणमध्ये तयार होतात 3 कोटींवर मूर्ती, 300 कोटींचा व्यवसाय यंदा फुलवेल हर्षाेल्हास!

औरंगाबाद/ पेण14 दिवसांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक

आठवडाभरातच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. देशभरात भाविकांत मोठा उत्साह आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सव कोरोनाच्या सावटात साजरा झाला होता. पण या वर्षी स्थिती चांगली आहे. या वर्षीचा गणेशोत्सव मोठा आनंद घेऊन येईल, अशी मूर्तिकारांना अपेक्षा आहे. गेल्या वर्षी लाॅकडाऊनमुळे त्यांच्या ९०% मूर्तींची विक्री झाली नव्हती, पण यंदा त्यांना १००% व्यवसायाची अपेक्षा आहे.

रायगड जिल्ह्यातील पेण तालुका आणि त्याच्या आजूबाजूच्या भागाला गणेशमूर्तींचे हब मानले जाते. हमरापूर, कळवा, जोहा, तांबडशेत, दादर, रावे, सोनकार, उरनोळी, हणमंतपाडा, वडखळ, बोरी, शिर्की या गावांत गणेशोत्सवाचे १० दिवस आणि पितृपक्षाचे १५ दिवस वगळता वर्षभर घराघरांत ६ इंच ते १२ फूट उंचीच्या मूर्ती तयार करण्याचे काम चालते. या भागात असे १६०० उद्योग आहेत. त्यांचा वार्षिक व्यवसाय २५० ते ३०० कोटी रुपयांचा आहे. तेथे दरवर्षी ३ ते ३.२५ कोटी मूर्ती तयार होतात. त्यापैकी १.२५ कोटी मूर्ती गोवा, गुजरात, मप्र, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू या सहा राज्यांच्या ठोक व्यापाऱ्यांना दिल्या जातात. त्यांच्यामार्फत देशभरातील किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचतात.

या भागात हमरापूर गणेश विभाग मूर्तिकार संघटना सर्वात मोठी आहे. तिच्याशी ४८० उद्योग शाखा जोडलेल्या आहेत. संघटनेचे सचिव राजन पाटील यांनी सांगितले की, मूर्तिकारांनी गेल्या वर्षी बँकांकडून ६५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, पण गेल्या वर्षी फक्त २५-३० कोटींचाच व्यवसाय होऊ शकला. त्यामुळेही बँकांचाही दबाव आहे. येथून मूर्तींची विक्री दरवर्षी जूनमध्ये सुरू होते. दीपक कला केंद्राचे नीलेश समळ यांनी सांगितले,‘जूनच्या पहिल्या आठवड्यात ९०० मूर्ती थायलंड आणि मॉरिशसला पाठवण्यात आल्या.’ गेल्या दोन वर्षांत निसर्ग व तौक्ते चक्रीवादळ, लॉकडाऊन आणि नंतर पुरामुळे मूर्तिकारांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात ४ फुटांपेक्षा मोठ्या मूर्ती तयार न करण्याचा आणि घरातच विसर्जन करण्याचा नियम लागू होता, त्यामुळे ९०% (सुमारे २२५ ते २७९ कोटींच्या) मूर्तींची विक्री झाली नव्हती. महाराष्ट्र मूर्तिकार संघटनेचे सदस्य नितीन मोकळ म्हणाले की, कितीही मोठे संकट आले तरी या उद्योगांचे काम थांबत नाही. कोणावरही रोजगार गमावण्याची वेळ येत नाही. गेल्या वर्षीची कसर या वर्षात भरून निघेल, अशी आम्हाला पूर्ण आशा आहे.

मूर्तिकार आणि व्यावसायिक अरविंद पाटील यांनी सांगितले की, गणपतीच्या ३०% मूर्ती शाडू मातीपासून आणि ७०% मूर्ती पीओपीपासून तयार होतात. यंदा कच्च्या मालाच्या दरात ३७% ते ४०० % पर्यंत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी १३५ रुपयांत मिळणारी माती किंवा पीओपीची बॅग यंदा १८५ रुपयांत मिळत आहे. रंग आणि ब्रशचे दरही खूप वाढले आहेत. त्यामुळे मातीची एक फुटाची रंग न दिलेली मूर्ती यंदा रिटेलमध्ये १५० ऐवजी २५० रुपयांत मिळेल. पीओपीची रंग न दिलेली मूर्ती १०० ऐवजी १५० रुपयांत मिळेल. मातीची रंग दिलेली मूर्ती ५०० ऐवजी ७५० रुपयांत मिळेल. पीओपीची रंग दिलेली मूर्ती ३०० एेवजी ४५० रुपयांत मिळेल.

बातम्या आणखी आहेत...