आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवकाळी:औरंगाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी वीज कोसळून 3 ठार, पाच जखमी, दिंडोरी तालुक्यात गारपीट

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिंडोरी तालुक्यात गारपीट; द्राक्षबागेत गारांचा खच...

औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागांना बुधवारी वादळी वारे व पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यात दोन घटनांत वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. पैठण तालुक्यातील ब्राह्मणगाव शिवारात विहिरीचे खोदकाम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर बुधवारी दुपारी वीज पडून २ ठार, तर ५ जण गंभीर जखमी झाले.

मृतांत साहेबराव चव्हाण (५०, देवगाव तांडा), सतीश राठोड (२५, एकतुनी तांडा) यांचा समावेश आहे. ब्राम्हणगाव शिवारातील एका शेतात विहिरीचे खोदकाम सुरू आहे. बुधवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे सुटल्याने विहिरीवर काम करणारे सर्व मजूर बाजूच्या लिंबाच्या झाडाखाली उभ्या एका बैलगाडीच्या आडोशाला बसले. याच वेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. जखमींत अमोल राठोड (२७), युवराज राठोड (३०), जैतालाल चव्हाण (२३), नितेश चव्हाण (२५), नीलेश चव्हाण यांचा समावेश आहे.

गुरुधानोऱ्याची महिला गतप्राण

शेंदुरवादा | सुलतानपूर शिवारात शेतात काम करत असताना वीज कोसळून गयाबाई कल्याण भावले (३५, रा. गुरुधानोरा, ता. गंगापूर) यांचा मृत्यू झाला. दुपारी पावसाला सुरुवात झाली. वीज कोसळून गयाबाई यांचा जागीच मृत्यू, तर सोबतची महिला, मुलगा व सासरा बचावले.

दिंडोरी तालुक्यात गारपीट; द्राक्षबागेत गारांचा खच...

नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी बुधवारी अवकाळी पाऊस झाला. दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक गावात बुधवारी सायंकाळी ६ वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. अर्धा तास गारांच्या पावसाने दोन किलोमीटर परिसराला जम्मू-काश्मीरचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे  

बातम्या आणखी आहेत...