आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सारी’:‘काेराेना’चा कहर सुरू असतानाच औरंगाबादेत 'सारी’ने 3 जणांचा मृत्यू; आतापर्यंत 'सारी’मुळे 15 जणांचा मृत्यू

औरंगाबाद3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात 24 तासांत एकही पाॅझिटिव्ह नाही

‘काेराेना’चा कहर सुरू असतानाच “सारी’नेही अाैरंगाबादेत थैमान घातले अाहे. शनिवारी तीन जणांचा मृत्यू झाला. दाेघे घाटीत मृत्युमुखी पडले, तर एकाने खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. “कोरोना’ची तपासणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत “सारी’मुळे १५ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी मृत्युमुखी पडणारे तिघेही पुरुष अाहेत, अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांनी दिली. यात एक ३५ वर्षांची व्यक्ती असून दुसरा १४ वर्षांचा मुलगा अाहे.

शनिवारी नांदेड, हिंगाेली, परभणीसह लातूर, बीड उस्मानाबाद, जालन्यात एकाही रुग्णाचे नमुने पाॅझिटिव्ह अाले नाही. बीडमध्ये आलेल्या १० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. हिंगोली जिल्ह्यात ७, नांदेडमध्ये ४२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. जालना जिल्ह्यात १३१, परभणी जिल्ह्यात एकूण १२३ लाेकांना क्वॉरंटाइन केले आहे.

नांदेडमध्ये शुक्रवारी एका मुलीचा मृत्यू झाला होता. शनिवारी तिच्यासह सर्व संशयितांचे सर्व अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. त्यात त्या मुलीचा अहवालही निगेटिव्ह असल्याचे समोर आले.

बातम्या आणखी आहेत...